धावत्या दुचाकीवर बिबट्याने घातली झडप, सुदैवाने जीवितहानी नाही

गडचिरोली : २२ सप्टेंबर – येल्ला-लगाम मार्गावरुन दुचाकीवरून जाताना एका युवकावर आज दुपारच्या सुमारास बिबट्याने झडप घातली.यात दुचाकीवरील युवक व त्याच्या मागे बसलेली महिला बाल बाल बचावली आहे.
आज दुपारी २ ते ३ च्या सुमारास येल्ला येथील आनंदराव रामटेके हा युवक व एक महिला कामानिमित्ताने लगाम कडे दुचाकीने निघाले होते.या मार्गावरून जातांना एका बाजूला असलेल्या धानाच्या शेतांकडुन बिबट्याने दुचाकीवर झडप घालण्याचा प्रयत्न केला .मात्र वेळीच प्रसंगावधान राखून रामटेके यांनी दुचाकीचा वेग वाढवला व समोर निघून गेले कापसाच्या शेतातून बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
या शेतात बिबट्याचे पंजाचे ठसे स्पष्टपणे दिसत आहे. मागील पंधरवड्यात येल्ला येथील टेकूलवार या शेतकऱ्याचा बिबट्याने बळी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून. या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात वाघ व बिबट्याचा हैदोस वाढला असून वन विभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

Leave a Reply