गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे एक मीटर उंचीने उघडले, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

भंडारा : २२ सप्टेंबर – गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळी वाढ झाल्याने धरणाचे सर्व ३३ दरवाजे एक मीटर उंचीने २१ रोजी दुपारी पाच वाजता पासून उघडण्यात आले आहेत. सात हजार ४८१ क्युमेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असल्याने नदीकाठावरील गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
वैनगंगा नदीवर असलेल्या गोसीखुर्द धरणाला भंडारा जिल्ह्यात गोंदिया आणि मध्य प्रदेशातील नद्यांचा भार सहन करावा लागतो. मध्य प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी गोंदिया जिल्ह्यातून वाहून येत गंगेला मिळते आणि वैनगंगेच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ होते पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्द प्रशासनाला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागतो.
२१ रोजी संध्याकाळी पाच वाजता धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचे सर्व ३३ दरवाजे १ मिटर ने उघडण्यात आले आहेत. धरणातून ७ हजार ४८१ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग प्रति सेकंदाला होत आहे. धारणा पुढील क्षेत्रात हे पाणी जाणार असल्याने नदीकाठावर असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला.

Leave a Reply