वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

रया गेलेले जमीनदार !

” काका , तुम्ही आम्हाला म्हणताय
रया गेलेले जमीनदार !
पण तुम्ही कोण आहात तेही सांगून द्या …
वतन नसलेले वतनदार ! कि राजकारणात वजन नुरलेले वजनदार !
खरं तर आपली दोघांचीही अवस्था सारखीच आहे !
आमची नखं गळाली आहेत , तर ,
तुमचे दात पडले आहेत !
व्हेंटिलेटरवरचे रुग्ण आणि आपले हाल अगदी सारखेच आहेत !
त्या मरतुकड्या वाघानी
सत्तेचं एक हाडुक दिल्यामुळे
आपल्यात थोडी धुगधुगी आली आहे !
अंगात थोडंतरी त्राण आलं आहे !
पण व्हेंटिलेटर निघाल्याबरोबर
आपले प्राणही जाणार आहेत !
याची जरा जाण ठेवा !
तुमच्या पराक्रमाची ‘ गीते ‘ गायला
सुरवात झाली आहे , याचंही भान ठेवा!
तुमच्या मागे फरफटत यायला आम्ही काही तुमचे ‘ नॉटी ‘ श्वान नाही !
आणि यापुढे तुमची बेताल बडबड आम्ही ऐकून घेणार नाही ! “

             कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply