सहारा इंडियाने खातेदारांची आर्थिक फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करा – शिवसेना

भंडारा : २० सप्टेंबर – सहारा इंडिया शाखा तुमसर येथे तालुक्यातील लोकांनी सहारावर विश्वास ठेवून मागील २५ वर्षांपासून गुंतवणूक केली आहे. त्यातील खातेदारांना मागील तीन वर्षांपासून सहारा इंडिया शाखा तुमसर कडून गुंतवणूक केलेल्या खातेदारांना रकमेचा परतावा देण्यास पूर्ण विराम लागला आहे. कोरोना संसर्गजन्य काळात अनेक गुंतवणूकदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे त्यांना पैशाची अत्यंत गरज भासल्यामुळे अश्या बऱ्याचशा खातेदारांना सहारा इंडिया तुमसर शाखेचे सतत तीन वर्षांपासून हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र गुंतवणूकदारांना सहारा इंडियाची मैचुरेटी पूर्ण होऊन अद्यापही रकमेचा परतावा मिळत नसल्यामुळे पीडित खातेदारांनी शिवसेनेकडे लेखी स्वरूपात तक्रार नोंदवून न्याय मिळवून देण्यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली. या अनुषंगाने शिवसेनेच्या माध्यमातून सहारा इंडियाच्या मुख्य कार्यालय लखनऊ तसेच जिल्हा व्यवस्थापक कार्यालय भंडारा यांना मागील वर्षीपासून सातत्याने पत्रव्यवहार करून सदर प्रकरण निदर्शनास आणून दिले होते. याप्रकरणी शिवसेनेकडून दिलेल्या निवेदनाची दखल घेत सहाराचे सेक्टर प्रबंधक परशार पांडे यांनी शनिवारी सहारा इंडिया तुमसर शाखेत येऊन खातेदारांशी सविस्तर चर्चा केली. मात्र सदर चर्चेतून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघत नसल्याने शिवसेनेसह खातेदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. परिणामी शिवसेनेने सहारा इंडियाच्या जिल्हा प्रबंधक आणि पीडित खातेदारांना घेऊन पोलीस स्टेशन तुमसर येथे सहारा इंडियावर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना सादर केले. यावर ठाणेकरांनी सेक्टर मॅनेजरला २१ सप्टेंबर मंगळवार रोजी खातेदारांच्या रकमेचा परतावा संदर्भात संपूर्ण कागदपत्रे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष तुमसर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे दिनेश पांडे, शिवसेना उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, उपतालुका प्रमुख संतोष पाठक, शाखा प्रमुख निखील कटारे, तुषार लांजेवार, सतीश बन्सोड, हेमंत नवखरे, सुमित व्यवहारे, मनीष ललवाणी, राजेश पेठे, रोशन कारेमोरे, संजय ठाकूर, देवेंद्र बानेवार, लक्ष्मीकांत मलेवार, अशोक सपाटे, चंद्रपाल वाघमारे, इक्बाल शेख, मनोहर बन्सोड, जगदीश कहालकर, सुशील डोंगरे, अरविंद मलेवार, रश्मी आस्वले, कविता नैताम, वर्षा भुरे, कमल गिरीपुंजे, सुनीता गलबले, अंजना साकुरे, विजय राऊत, विजय धांडे, रामगोपाल नंदनवार सह खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply