रशियामध्ये विद्यापीठात झालेल्या गोळीबारात ८ जणांचा मृत्यू , ६ जखमी

मॉस्को : २० सप्टेंबर – शियातील पर्म विद्यापीठात एका माथेफिरूने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. विद्यापीठात अज्ञात हल्लेखोराने अचानक गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे वर्ग आणि इमारतीमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि छतावरून उड्या मारत धूम ठोकली. या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर कमीत कमी ६ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार हल्लेखोर १८ वर्षांचा आहे. हल्ला करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर हल्ल्याची माहिती दिली होती. पर्म विद्यापीठ रशियातील पर्म शहरात आहे. येथे देशभरातील विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. सुरक्षा दलांनी हल्लेखोरास अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये घाबरलेले विद्यार्थी जीव वाचविण्यासाठी खिडक्यांमधून व इमारतीच्या छतावरून उडी मारताना दिसत आहेत. पर्म स्टेट यूनिवर्सिटीमध्ये हा हल्ला झाला आहे. पर्म शहर हे मॉस्कोपासून ७०० मैल (१,१०० किलोमीटर) दूर आहे. विद्यापीठात सुमारे १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Leave a Reply