नागपुरात बुटीबोरी परिसरातून तब्बल १ कोटी १० लाखाचा गांजा जप्त

नागपूर : १३ सप्टेंबर – ग्रामीण गुन्हेशाखेने रविवारी केलेल्या कारवाईत बुटीबोरी परिसरातून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. ग्रामीण गुन्हेशाखेचे एक पथक बुटीबोरी परिसरात गस्त घालत होते. एक ट्रक (आरजे-२७ : जीए-८८०४) आंध्र प्रदेशातून निघाला असून तो नागपूरमार्गे जाणार असल्याचे पोलिसांना कळाले. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पाळत ठेवली. यावेळी हिंगणघाट ते नागपूर या मार्गावर हा ट्रक आढळला. पोलिसांनी तो थांबवून झडती घेतली असता १,१०४ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला. ट्रकचालक रोहित लखन जयस्वाल (वय २५, रा. पना, मध्य प्रदेश) आणि त्याचा क्लीनर सहकारी सोनू कवरसिंग चौहान (३२, रा. भिवानी, हरयाणा) याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, गुन्हे शाखेचे अनिल जिट्टावार, राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे आणि त्यांच्या चमूने केली.

Leave a Reply