केंद्र सरकर लवकरच आणणार फ्लेक्स इंजिन पॉलिसी – नितीन गडकरी

जयपूर : १३ सप्टेंबर – केंद्र सरकर लवकरच फ्लेक्स इंजिन पॉलिसी आणणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते सोमवारी राजस्थानच्या विधानसभेत आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की देशातील वाहन चालकांकडे वाहन पेट्रोलने चालवावे की १०० टक्के इथेनॉल इंधनने चालवावे, यासाठी पर्याय असणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार फ्लेक्स इंजिन पॉलिसी आणणार आहे. संसदीय व्यवस्था आणि लोकांच्या अपेक्षा या विषयावरील चर्चासत्रात नितीन गडकरी बोलत होते.
देशातील शेतकरी गहु, तांदळासह पेट्रोल-डिझेलचेही उत्पादन करू शकणार आहेत. देशातील शेतकरी धान्यासह इंधनाचे उत्पादनही करू शकणार आहेत. मिक्स फ्लेक्स इंजिन पॉलिसी अमेरिका, ब्राझील आणि कॅनडामध्ये लागू आहे. त्या पद्धतीने आपल्याकडे हे धोरण आणण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, की काही राज्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. राजस्थानसह कर्नाटक, गुजरात, तेलंगाणा, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. जोपर्यंत ५० टक्के सुपर जलसिंचन होत नाही, तोपर्यंत देशात पूर्णपणे शेतकरी आत्मनिर्भर आणि संपन्न होऊ शकणार नाही.

Leave a Reply