सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

Yes, I am guilty

“अहो आश्चर्यम् भवति” – समय का ये पल थमसा गया है। घड्याळ्याचे काटे विसावले. घड्याळ चालवणारे चालक मालक सत्ताधीश, पन्नास वर्षात जे जपुन ठेवले, त्यावर नको असताना व्यक्तव्य दिलं आणि झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली.
सध्या ED ED ED चा भारतभर गाजावाजा सुरू आहे. मविआ दे मनात येईल त्या शिव्या ED ला घालण्यात धन्यता मानत आहे.
केंद्र सरकार ED चा ससेमिरा मविआ सरकारच्या शीर्ष नेत्यांवर कारवाई करुन सरकार पाडण्यासाठी अधिकारांचा गैरवापर करीत आहे,अशी हाकाटी पिटवण्यात येत आहे. अधिकारांचा गैरवापर म्हणजे काय हो? निलंबित वाझेला पैसे घेवून, वसुली साठी परत नौकरी वर रुजु करणे!!!! की वाझे नी अधिकाराचा गैरवापर करून मनसुख हिरेनला यमसदनी पाठविणे!!! की अंबानी ला घाबरवून त्याच्या कडून खंडणी गोळा करण्याचा मनसुबा रचणे !!!! की मंदिरं बंद ठेवून हिंदू जनांची मानसिकता खच्ची करणे!!!! की अर्णव गोस्वामीला घरातून उचलून नेणे !!! की नारायण राणे ला कानाखाली च्या नावाखाली अटक करणे!!! की पालघर संतांच्या हत्याकांडाला हलक्यात घेणे!!!!
साहेब, वर जितके दाखले दिले आहेत ते देण्याची खरं म्हणजे गरज नाही. सर्वसामान्य नागरिकांना कळते आहे की तुमचे चुकते कुठे? आजतागायत राजकारणातील तुमचे पन्नास वर्ष एकीकडे आणि आताच्या सरकारातील दीड वर्ष एकीकडे. ह्या दिड वर्षात तुमच्या अनुभवाचा कस लागला. स्वतः ची मलिन प्रतिमा लख्ख स्वच्छ ठेवली होती, तुम्ही.अगदी “तेलगी” स्टॅंप पेपर घोटाळ्यात तुमचे नाव तेलगी ने घेतल्याचे ऐकिवात होते. तेव्हा वाटले होते की घड्याळाचे काटे थांबले. पण तुमचा राजकारणी संबंध, राजकारणातील उंची, राजकारणातील धागेदोरे आणि ह्याउपर राजकारणी विकत घेण्याची तुमची क्षमता. ह्यामुळे तुमच्या केसाला धक्का लावायची बिसाद नव्हती. पण शिवसेनेचा संग केला, “संग संगती दोषा: – गुण नाही पण वाण लागला. साहेब, आपण जेव्हा कोणाला आपल्या बाजूला बसवतो तेव्हा आपली आणि त्याची दोघांची उंची बरोबर बसते का? हे बघणे अतिशय आवश्यक असते. नाहीतर जवळच्या फायद्यासाठी जन्मभराची नुकसानी होण्याची दाट शक्यता असते. विश्वासघाताने सत्ता काबीज करण्यात हातखंडा जरी असला तरी सत्तेवर कोणाला बसवायचे ? ह्यामध्ये तुम्ही भावनेच्या भरात, एका जंतुक संपादकाच्या आग्रहाला बळी पडून शिवसेनेच्या पक्षाध्यक्षाला मुख्यमंत्री बनविला तर खरं! पण ज्याला फक्त पक्ष चालविण्याची शक्कल आहे आणि सरकार चालविण्याची शुन्य अक्कल आहे. अशा भावना प्रधान अवस्थेत मुख्यमंत्री नेमला आणि आपले जे विधान होते की अंगाला तेल लावून पहिलवानकी करणारा मी खेळाडू नाही तर मी ऑर्गनायझर आहे. ह्या विधानाला तुम्ही कमी पडलात.
आज जी काही वेळ आली ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची प्रशासनावर पकड नव्हती, प्रशासन कसे चालते किंवा कसे चालवायचे याची तसूभर कल्पना नसणारी व्यक्ती जेव्हा शीर्षस्थ पदी विराजमान होते आणि आपली सत्ता – आपला स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा वागायला लागते, तेव्हा आपण त्याला “माकडाच्या हाती कोलीत” म्हणतो. हे कोलीत तुमच्यामुळे माकडाच्या हाती आलं आणि बुमरॅंग बनून तुमच्यावर उलटलं.
समयाधीश, तुम्ही सांगा, अशा किती केसेस अगदी ख-याखु-या होत्या आणि कोर्टात त्या स्थापित झाल्या???? शिवसेना किंवा मविआ सरकारने केलेल्या केसेस मध्ये एकसुद्धा केसची कोर्टात दखल घेतली नाही. अर्णव गोस्वामी सुटला, नारायण राणे सुटला. म्हणजे जे राजकारण, अधिकाराचा गैरवापर करता तो मविआ सरकार करते. एका पक्षाला आदेश द्यायचा तसा सरकारी पदी, पैसा घेऊन परत रुजू केलेल्या आपल्या भडव्यांना, आदेश देवून अधिकारांची पायमल्ली करता. की ज्या केसेस कोर्ट रद्दबातल ठरवते. मात्र ह्याच्या उलट केंद्र सरकार जेव्हा ED मागे लावते तेव्हा, तुमचे आमदार, मंत्री गण खुप मोठमोठ्या गप्पा मारतात. डरकाळ्या फोडतात ED अधिक शिकंजा कसला की डरकाळ्या सोडून “टाहो फोडतात” आणि त्यानंतर भुमिगत होतात. साहेब, कर नाही त्याला डर कशाला? मग तुमचे देशमुख, परब गायब कशाला?
काय सामान्य जनतेला एवढे कळंत नाही की सत्तेचा गैरवापर कोण करतं आहे.
आजपर्यंत तुमच्या अतिदीर्घ संयमी कारकिर्दीला आपण मानलं होतं बुवा. अनिल देशमुख पण भुमिगत झाला त्यावेळी सुद्धा तुमच्या अमित शहा, पंतप्रधान ह्यांच्या गाठीभेटी – देशमुखा ने तुमचे दोन कोटी साठी घेतलेले नाव. ह्या सगळ्या प्रकरणात तुमच्या शांत हालचाली. हा तिढा कसेही करून सोडवायचा आणि आपली प्रतिमा परत साफ ठेवण्यासाठी तुमची चाललेली धडपड काय, आम्हा सामान्य जनांना कळंत नव्हती? तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही – जन जन वाकिफ आहे – पण तुम्ही कधी सापडला नाही, भ्रष्टाचाराचा डाग लागु दिला नाही – राजकारणातील प्रतिमा मलिन होवू दिली नाही – ही तुमची राजकारणातील जमेची बाजू आहे. आजपर्यंत सर्व राजकारणी तेरी भी चूप मेरी चुप… पहिल्यांदा असे झाले की स्वच्छ इमानाचा चारित्र्यवान पंतप्रधान भारताला लाभला आणि भ्रष्ट राजकारण्यांची सद्दी संपाया लागली.
आम्हाला वाटले होते की तुम्ही देशमुख प्रकरण मॅनेज केले. त्याला गायब करून,कसे ही करून स्वतः चे नाव यामध्ये येवू नये म्हणून तुमचे कसोशीच्या प्रयत्नांची दाद देणार होतो की तेवढ्यात “परबांचा अनिल पण देशमुखांच्या अनिलासारखा” भुमिगत झाल्याच्या वावड्या उठल्या आणि समयाधीशांचा तोल गेला. अहो आश्चर्यम् भवति – समयाधिशांनी वक्तव्य केले केले की “विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ED चा वापर केंद्र सरकार करते आहे” समयाधिशांनी पन्नास वर्षात कमावलेली लख्ख राजकारणी प्रतिमा, एका झटक्यात मलिन झाली. साहेबांनी वैतागा वैतागा मध्ये एका झटक्यात सांगून दिले, ” हो मी पण आरोपी”. देशमुख तर होताच् आता परब पण सामील. किती किती सांभाळू रे तुम्हाला. बापाची व्यथा बापाला कळते. मविआ सरकारचा एका अर्थाने बाप म्हणजे समयाधीश, महाराष्ट्राच्या राजकारणी घड्याळाचे काटे ज्यांच्या इच्छेशिवाय हालत नाही त्या समयाधीशांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी ED वर आपला राग व्यक्त केला, केंद्र सरकारला जबाबदार धरले. पन्नास वर्षांची कारकीर्द पणाला लागली आणि नाईलाजास्तव तुम्हाला केंद्रावर आक्षेप घ्यावा लागला आणि अप्रत्यक्षरीत्या समयाधीश तुम्ही हामी भरली, “Yes, I am guilty.” केंद्र सरकार कडून ज्या काही ED मार्फत केसेस लावल्या गेल्यात, त्या सर्व कायदेशीर रित्या कोर्टात वैध असताना, आपलं येणारं वक्तव्य हेचं सांगतं. अप्रत्यक्षरीत्या तुम्ही म्हणताय, “Yes, I am guilty”. आता खरंच देशमुख, परब ED ला सापडले तर समयाधीशांचे नाव येण्याची शक्यता नाकारता येण्याजोगी आहे का????? मोठे प्रश्नचिन्ह असू शकते.
राजकारणात मिळालेली संधी म्हणजे शत्रू सुद्धा मित्र. पण त्या मित्रामध्ये मैत्री निभवायची लायकी लागते जी शिवसेनेत दिसत नाही. शिवसेनेचा उपटसुंभ प्रवक्ता मिडिया समोर गरज नसताना आपल्या निकामी मेंदुच्या कंपाउंडरी कल्पना घेऊन जगासमोर मांडत असतो. साहेब, गरज नसताना उगीचच मिडीयासमोर तोंडफोड करायची गरज काय? पण पोराला सत्ता दिली की त्याचा जसा मुलायम सिंग यादव होतो, त्याप्रमाणे तुमची दोन सत्ताधार्जिणी मुलं एक मिडियासमोर कोकलणारा, दुसरा घरात बसून फेसबुकवर खोकलणारा. दोघांनी तुमच्या राजकारणी जीवनाचे तीन तेरा वाजवले, पडत्या काळात. बापाचं दु:ख बापाला ठावे – पोरांना फक्त सत्ता भावे.
साहेब, केंद्र सरकारवर टीका केली आणि नकळत, अप्रत्यक्षरीत्या पापात आपला सहभाग दर्शविला. पन्नास वर्षाच्या कारकिर्दीचे मुल्यमापन करताना सामान्य जनता एवढेच लक्षात ठेवणार की शिवसेनेला बाजूला बसविण्यात तुम्ही चुकलात. त्याची परिणती शिवसेनेने तुमचा मुलायमसिंह बनविला आणि तुम्ही अप्रत्यक्षरीत्या पापाचा वाटा आपल्या पदरात घेतला. केंद्र सरकारला ED बाबत धारेवर धरले आणि लोकं हेच् समजतील की सायलेंट मोड मध्ये समयाधीश म्हणताहेत,”Yes, I am guilty”.

भाई देवघरे

Leave a Reply