भारतातील मुसलमान हे मूलतः भारतीय वंशाचेच आहेत तसेच हिंदू आणि मुसलमान यांचे मूळ एकच आहे अशा आशयाचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत बोलतांना केल्याचे वृत्त देशभरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारे ठरले आहे, त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार, नाना पटोले, संभाजी ब्रिगेड अश्या सर्वानीच आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आजून कोण कोण काय काय प्रतिक्रिया देतील ते आता बघायचे आहे.
भागवतांच्या वक्तव्यात काहीच तथ्य नाही, असा भागावत विरोधकांचा दावा आहे, मात्र शांतपणे विचार केल्यास यात तथ्य सापडू शकते भारतात सुरुवातीपासून हिंदूंचेच वास्तव्य होते. सुमारे सातव्या शतकात मुस्लिम आक्रमकांनी भारतावर आक्रमणे केली. सुरुवातीला लुटालूट करायला येणारे मुस्लिम नंतर इथेच राहून राज्य करू लागले. त्या काळात धर्मवेड्या मुस्लिम शासकांनी तलवारीच्या जोरावर बहुसंख्य हिंदूंना बाटवून मुस्लिम बनवले. तत्कालीन समाजरचनेनुसार त्यातील काही हिंदूंना मूळ धर्मात परत यावेसे वाटलेही असेल, मात्र त्यांना हिंदू धर्मात परत येत आले नाही, त्यामुळे हे बाटलेले सर्व मुसलमान म्हणूनच पिढ्या न पिढ्या जगात राहिले. नंतर इंग्रजांचे राज्य आले, इंग्रजांनी जातांना हिंदुस्थान आणि पाकिस्तान असे दोन तुकडे केले. त्यावेळी मुसलमानांनी पाकिस्तानात जावे असे अपेक्षित होते, तरीही बहुसंख्य मुस्लिम भारतातच राहिले. तेच मुस्लिम आज भारतात वास्तव्याला आहेत. हा मुद्दा विचारात घेतल्यास सरसंघचालकांच्या दाव्याची यथार्थता पटते.
भारतात हा मुद्दा फक्त मुसलमानांच्या बाबतच आहे असे नाही तर बहुसंख्य खिश्चन बांधवांच्या बाबतीतही हाच प्रकार घडला आहे. १२व्या शतकात ख्रिश्चन भारतात आल्यावर त्यांनीही व्यापक प्रमाणात धर्मांतर केले. मूळ ख्रिश्चन आपल्या देशात परत गेले, भारतसात ख्रिश्चन झालेले भारतीय इथेच राहिले, त्यामुळे भारतातील ख्रिश्चनांचे मूळ तपासल्यास तेही मुलाचे हिंदूच आहेत असे लक्षात येते.
हा मुद्दा शरद पवार किंवा नाना पटोले यांना माहित नाही असे नाही मात्र विरोधाकरिता विरोध या न्यायाने हे प्रकार सुरु आहेत हे लहान मुलंसुद्धा सांगेल.
भारतात हिंदू मुस्लिम,ख्रिश्चन, बौद्ध, शीख जैन या सर्व धर्म किंवा पंथाचे लोक हे मूळचे हिंदूच होते हे वास्तव कधीच नाकारता येत नाही त्यामुळे सर्वांनी भारतात गुण्या गोविंद्याने राहावे, जातीय दंगली करू नये, इतकेच भागवतांना अपेक्षित असावे. हे मुद्दे लक्षात घेता पवार आणि पटोलेंचा विरोध हा निरर्थकच ठरत नाही का?
अविनाश पाठक