वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

कोथळा !

आजकाल कोणीही लेकाचे पाद्रापुद्रे जेव्हा ,
कोथळा काढायच्या गोष्टी करताना दिसत असतील ,
तेव्हा,भारतातील तमाम लोकांसोबत
खुद्द महाराजही स्वर्गात हसत असतील !
म्हणत असतील,अरे घरात बसून कोमट पाणी पिणाऱ्या घरकोंबड्यांनो,
मी कोथळा काढला होता तो देशाच्या शत्रूचा ! हिंदूंच्या शत्रूचा !
आणि तुम्ही कोथळा काढायला निघालाय, कट्टर देशभक्तांचा ? हिंदूंच्या परम हितचिंकांचा ?
आणि मी ज्याचा कोथळा काढला त्याच्याच पिलावळीशी आज तुम्ही शय्यासोबत करता ?
त्यांच्याबरोबर बसून एकाच ताटात जेवण करता ?
अरे , इतके आत्मघातकी तुम्ही झालातच कसे ?
वाघ होतात पूर्वी वाघ ,आता झालात कसे ससे ?
अरे, कोथळा काढायचाचअसेल ,
आणि , तुमच्यात खरोखरच काही दम उरला असेल ,तर,
काढा त्या फाळणीसाठी जबाबदार असलेल्या,
लाखो हिंदूंच्या कत्तलींना कारणीभूत असलेल्या,
आपल्याच देशात लाखो हिंदूंना परागंदा करणाऱ्या, निर्वासित बनवणाऱ्या काँग्रेसचा !
अरे ! थू तुमच्या सत्तेसाठी लाचार झालेल्या, सत्तालोलुप झालेल्या ,
परकी मडमेसमोर शेपट्या हलवणाऱ्या जिनगानीवर !
आज लाज वाटते रे मला तुमची !
खरंच लाज वाटते मला तुमची !!

         कवी -- अनिल शेंडे

Leave a Reply