मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर डान्स करणाऱ्या ३ पोलिसांना आ. संजय गायकवाड यांनी दिला चोप

बुलढाणा : ७ सप्टेंबर – देऊळगावमही नजीक असणाऱ्या सरंबा फाट्यावर वाहतूकीचा खोळंबा करुन मद्यधुंद अवस्थेत डान्स करणाऱ्या ३ पोलिसांना बुलडाण्याचे दबंग आमदार संजय गायकवाड यांनी चोप दिला. रविवार ५ सप्टेंबर रोजी दे.राजा ते चिखली रोड सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास जवळपास १ किलोमिटर ट्राफिक जाम झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांची औरंगाबादवरुन भेट घेवून आ.संजय गायकवाड बुलडाण्याकडे परत येतांना त्यांनी खाली उतरुन ट्राफिक जाम का झाली? तपासण्याचा प्रयत्न केला असता चालत-चालत ते पुढे आले तर पोलिस स्टीकर असलेली एमएच २८ एएन ३६४१ क्रमांकाची गाडी रस्त्यात उभी करुन त्यातील ३ जण रस्त्याच्या कडेला डान्स करतांना आ. गायकवाड यांना दिसले.
आ.गायकवाड यांनी त्यांना अगोदर समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी आ.गायकवाड यांनी त्यांच्या स्टाईलने त्या ३ जणांची जोरदार पिटाई केली. ही धुलाई उपस्थित अनेकजण पाहत होते.

Leave a Reply