बेळगाव एक नांदी
बेळगांव ला भाजपा ला बहुमत मिळाले आणि बेळगांव जनतेने मतदानाद्वारे आपल्या मनातील महाराष्ट्र सरकारावरील आपला रागाला वाट मोकळी करून दिली.
तसे बघितले तर सरकार चालविणे हे पक्ष चालविण्याइतके सोपे नाही. त्यासाठी मुख्यमंत्री पदी बसलेली व्यक्ती सक्षम असणे अतिशय महत्वाचे. मुख्यमंत्र्यांची सरकारी दफ्तरांवरची पकड अतिशय महत्वाची. जनतेच्या मनातील चाललेली घालमेल, जनतेच्या संसारासाठी लागणा-या साधन सामुग्री ची उपलब्धतता करून देणे. महाराष्ट्रातील प्रत्येक संसाराची जबाबदारी घेवून, जनतेच्या हितासाठी राबणे, निस्वार्थी सेवाभाव घेऊन जनतेच्या आणि राज्याला सुखी करण्यासाठी सर्वस्व लावून देणे. म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री.
एका त्रयस्थ नजरेने देशाच्या पंतप्रधानांकडे अर्थात मोदींकडे बघितले तर मी काय म्हणतोय याचा अंदाज येईल. नि:शंक – मोदी आणि उद्धवाची तुलना होणे कदापि अशक्य. आणि मी करु पण इच्छित नाही. मोदींचे गुणगान लिहीता लिहीता लेखणी थकणार नाही आणि उद्धवाचा स्वार्थ विदीत करताना अनेक व्यवधान पाळावे लागतील. अन्यथा अक्षरशः आईबहिणींच्या शिव्यांचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही. म्हणून थोडेफार इथे देत आहे.
मोदींबद्दल एकच् गोष्ट सांगावीशी वाटते, वीस वर्षे झाली हा संघाचा स्वयंसेवक राजकारणात मुख्यमंत्री नंतर पंतप्रधान झाला. पण त्यांचे छोटेखानी घर ही त्यांची मालमत्ता, भ्रष्टाचार अफरातफरीचा एक डाग नाही अंगाला. आणि दिवसातले १८-१८ तास देशसेवेसाठी निस्वार्थ बुद्धीने. राजकारणात निर्णय चुकला तरी निर्णय निस्वार्थ बुद्धीने घेतल्या गेल्या असेल तरी तो निर्णय योग्य निर्णय असे मानणे उचित ठरेल. अन्यथा मौन मोहन सिंग एक बेअसरदार सरदार पंतप्रधान पदी शिखांच्या पगडीला बट्टा लावणारा प्रधानमंत्री बघा. ज्याने २६/११ चा पाकिस्तान शी बदला घेण्याऐवजी “घोर निंदा” करून संताप व्यक्त केला होता. आणि हल्ल्यात मरण पावलेल्या भारतीय नागरिकांची विडंबना केली होती. कॉंग्रेस प्रणाली भारतीय नागरिकांची हत्या, विडंबना ह्यासाठी बनलेली आहे. तर दुसरीकडे आतंकवादी पोसणे, पाकिस्तानी आतंकवाद्यांना खत पाणी पुरवणे, भारतात ईस्लाम धर्माची लागवड करणे, हिंदू धर्माची पाळेमुळे खणून खणून त्यावर धर्मांतराची झालर चढविणे, भारतातून हिंदू धर्माचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सदैव कार्यरत म्हणजे कॉंग्रेस आणि तत्सम पक्ष. आणि सहा वर्षांत मोदींनी कॉंग्रेस ची पाळंमुळं खणून काढली. भारतीय जनतेला भेदभाव रहित मदत केली. आज आपलं कोणी ऐकणारा सरकारमध्ये बसलाय ह्याची जाणीव सामान्य लोकांपर्यंत पोचली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आज येमेन, अफगाणिस्तान अशा देशांमधुन भारतीय नागरिक आणि आंतरराष्ट्रीय नागरिकांची सुटका करून मोदींनी “वसुधैव कुटुंबकम्” समष्टी चा अनुभव जगाला दिला आहे. कोरोना मध्ये मोफत लसी वाटप करुन, राज्य सरकारमधील तोंडचे भ्रष्टाचाराचे पैसे , सामान्य जनतेकडे वळते करून सामान्य जनतेच्या हृदयात आपले स्थान आणखी जास्ती मजबूत केले आहे.
कोरोना काळ, अफगाणिस्तान, येमेन युद्ध अशा स्तरावर वाचक मित्रांनो, फक्त एक विचार करा की जर कॉंग्रेस असती तर भारतीय जनतेचे काय हाल झाले असते? लसीकरणासाठी सामान्य जनतेचे काय केले असते? विदेशी लसी आम्हाला जबरदस्तीने दरडोई २-४-५ हजारात पडल्या असत्या. म्हणजे ज्या कुटुंबात ६-७ माणसं त्यांना झक्कत १४-३५ हजार रुपयांपर्यंत खर्च लागला असता. चीनी लसीचे प्रयोग न कळत आमच्यावर केल्या गेले असते. शक्यता नाकारता येणार नाही.
अन्न पुरवठा काळाबाजारीने प्रत्येक माणूस हैराण झाला असता. काश्मीर आतापर्यंत तालिबान्यांनी गिळंकृत केला असता. येमेन मधील जनता आतापर्यंत मारली गेली असती, अफगाणिस्तान मधील भारतीय कुत्र्यापेक्षा बत्तर मौत मेले असते आणि मुख्य म्हणजे चीन भारताच्या हद्दीत आतपर्यंत ठाण मांडून बसला असता आणि कॉंग्रेस जनांनी त्याप्रमाणे भारताचा बदललेला नकाशा बनवून वैधानिक मान्यता दिली असती.
मुसलमानांचे लांगूलचालन करणारी कॉंग्रेस – आताच्या सहा वर्षांत माहिती नाही काय काय जुलुम गैर मुसलमानी जमातीवर झाले असते? किती बलात्कार, किती खुन आणि किती धर्मांतर….. नुसता विचार करा ! अंगावर काटा येतो आणि मनोमन देशावर मोदी विराजमान आहेत ह्याचा अभिमान वाटतो.
मात्र जे भाग्य देशाला लाभले त्याच्या विपरीत भाग्य महाराष्ट्राला लाभले आणि दीड वर्षात महाराष्ट्राचे प्रगतीचे दिवे लुप्त झालेत. केंद्राकडून आलेली कोरोनाची रसद रसातळाला भ्रष्टाचारात गेली, हिंदू जनतेचे हाल हाल केले, मंदिर बंद केली, फाटु मुख्यमंत्री कोरोनाच्या नावाने घरात बंदिस्त झाला, जनतेला कोरोना काळात वा-यावर सोडले. पंढरपूरासाठी कार चालविणारा मुख्यमंत्री सरकार चालविण्यात पुर्णपणे अपयशी ठरला. अरे! मुख्यमंत्र्या जो वारकरी “विठ्ठल” नावाचा श्वास घेतो त्याचा श्वास तू पळविला, विठ्ठलाच्या नावाने वारक-यांना दररोज नवीन संजीवनी मिळत असते त्या संजीवनीला तू नष्ट करण्याचा प्रयत्न करतोयस. आणि वर मुजोर एकादशी ची पुजा तू आपला एकाधिकार मानून, स्वार्थी लोभापायी निस्वार्थ भाविकांची कुचंबणा उद्धवा तुला महागात पडणार. अरे, शिशुपालाचे शंभर अपराध होण्यासाठी कृष्ण थांबला होता. तुझ्यासाठी विठ्ठल वाट बघतोय. पण मरण तुला विठ्ठलाच्या हाती येणार नसुन, तुझी दुर्गती मतदाराच्या हातून होणार. बेळगाव चे मतदानाचे रिझल्ट्स हेच् दर्शवीत आहेत.
पालघर संतांच्या हत्येचं तुला सोयरसुतक नाही तद्वत मतदाराला सुद्धा तुझे सोयरसुतक राहणार नाही.
अरे! परब, देशमुख आरोप झाला की डरकाळ्या फोडतात आणि भ्रष्टाचाराचे हिशेब मागितले की पादरे, फुसके लपून बसतात ह्यातच् तुझ्या रोजच्या अपराधाची भर वाढत आहे. जनतेच्या हिश्श्याचा पैसा जर राजकारणी आपल्या खिशात घालताहेत तर मतदार तर तुला हिसका दाखविणार हे निश्चितच आहे.
प्रश्न हा नाही की की कोरोना आहे. प्रश्न हा आहे की कोरोनाच्या नावाने शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने अक्षम्य दिरंगाई करून मुलांच्या शिक्षणाचे तीन तेरा वाजविले आहेत. आजसुद्धा बारावी चे विद्यार्थी विश्वविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अंधारात आहेत.
शिक्षण क्षेत्रात फक्त महाराष्ट्रात घाणेरडं चित्र आहे. बाकी राज्ये सर्व गाड्या रुळावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
उद्धवा तुझा तो सं-पाद क रोज मिडिया वर येवून पाठच्या फुसक्या सोडतोय. काही गरज आहे का? कामाचं सोडून अहंकाराचा दर्प, सत्तेचा माज ह्या पलिकडे जाऊन भ्रष्टाचारी राजकारण्यांची पाठराखण करताना दिसतोय. काही गरज आहे का? तू विचार कर उद्धवा. लोकांसाठी कामाचे कोणी बोलतंय??? राज्य सरकारात सगळे आपापला पक्ष चालवीत, सामान्य जनतेला धमक्या देत देत लॉकडाऊन लावताय. अरे! घरात तुझ्यासारखे सामान्य जनता नाही राहु शकत. हातावर पोट असणारी जनता. त्यांचं घर चालविण्याचं त्रैराशिक तुला कळणार सुद्धा नाही कारण तुम्ही गरीबी बघितली नाही. ज्या काळात सामान्य जनता स्ट्रगल करीत असते त्या काळात तुम्ही बिनधास्त”फोटोग्राफी” चा शौक पार पाडत होतात. त्याच् वयात तुमचा मुलगा “मातोश्री २” वर ३५ खोल्यांच्या घरात राहतोय. तुमच्या कडे जसा पापाचा पैसा बरसत असतो तसा सर्वसामान्य जनतेला असा पैसा मिळत नसतो. ईमानदार फार थोडे शिल्लक असलेले अशा पैशाला घरात घेत नसतात. अशा पैशांवर तुम्ही बंगल्यावर बंगले बांधताय आणि सामान्य जनतेला मात्र चुकीचे निर्णय घेवून खंगवताय. पाच वर्षाचा माज एका दणक्यात उतरवणारा मतदार राजा तुम्हाला जन्मभर लक्षात ठेवणार.
मोदी गरीबी तून वर आलेत. त्यांनी गरीबी आणि गरीबांचे हाल, पैशाखातर अब्रुचे धिंडवडे जवळुन अनुभवले आहेत म्हणून तर सर्वात पहिले लाल किल्ल्यावरील भाषणातून त्यांनी “शौचालय” बांधण्यासाठी कंबर कसली ते गरीबांची अब्रु वाचविण्यासाठी. बंद दरवाज्याआड विधी आटोपण्याची. पण गरीबी अनुभवली नसल्याने, तुमच्या सरकारात गरीबांसाठी तो कळवळा नाही. मी…. माझे सरकार असे विणलेल्या अहंकाराच्या जाळ्यात तुम्ही मतदारांना फसवू पाहताहात. तिकडे विठ्ठल तुमचे शंभर मोजतोय, मतदार तुमच्यातील माज, अहंकार, भ्रष्टाचार, अनैतिकता बघतोय. जनतेसमोर सादर करण्यासारखी एक सुद्धा चांगली गोष्ट तुम्ही केलेली नाही अशा परिस्थितीत तुमचा बेळगावला झालेला पराभव हा तुमच्या कारकिर्दीच्या पराभवाचे द्योतक आहे. विजयी भाजपाच्या आनंदी मिरवणुकीवर केलेला लाठीहल्ला हा तुमच्यातील अहंकारी वृत्तीचा मापदंड आहे. पाच वर्षे विश्वासघाताने हिरावलेली सत्ता सांभाळून राज्य करण्याची तुमची लायकी आणि कुवत दोन्ही नाही. नाहीतर मुख्यमंत्री झाल्यानंतर मला शिकायला सहा महिने द्या. अशी विनंती फडणवीसांनी मान्य केली हा फडणवीसांचा मोठेपणा आणि तुमच्या अज्ञानाचे वाभाडे. पण दीड वर्षांनी सुद्धा ह्यात खुप फरक पडला असे जनतेला जाणवले नाही. जाणत्या राजाच्या मांडलिकत्वाखाली चालणारी तुमची शिव-मांडलिकत्व शाही सुद्धा तुमच्या ज्ञानाचे वाभाडे काढतेय. तुमच्यात आज सुद्धा तो वकुब नाही आला की तुम्ही जनतेची नाडी ओळखून जनतेसाठी कामे करून, जनतेच्या हृदयात घर करु शकाल. बेळगांव चा पराभव तुम्हाला हेच सांगतोय. बेळगांव ही तर नांदी आहे – तुटणार मविआ ची फांदी आहे.
भाई देवघरे