वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

बे मुनव्वर बेवफा ….!

शायर जरी तूअसशी टायर पंक्चरलेला!
धोकादायक गाझी तुझी तर ऐसीतैसी !

नाव जरी तव राणा करणी चांडाळाची!
कपटी क्रूर बेमान तुझी तर ऐसीतैसी !

तुलना करतो वाल्मिकिची त्या आतंक्यांशी !
झडो तुझी ती जीभ तुझी तर ऐसीतैसी !

खातोस जिथे तू तिथेच करतो घाण !
त्यातच हो रममाण तुझी तर ऐसीतैसी !

हिंदी हिंदू कविसम्मेलन तुला पोसती
विसरलास उपकार तुझी तर ऐसीतैसी !

मातेवर तू लिहितो कविता मातृघातक्या !
विषवमना करतोस तुझी तर ऐसीतैसी !

गद्दारी तर रक्तातच रे भिनली तुझिया!
अस्तनीतल्या सापा तुझी तर ऐसीतैसी !

सपा नि बसपा झाले सारे सफा तुझे ते
नुरला तुज आसरा तुझी तर ऐसीतैसी !

प्यारा आधी पाक तुला नि आता काबुल !
मग तिथेच निघुनी जा तुझी तर ऐसीतैसी !

          कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply