अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीचा लूक आउट नोटीस जारी

मुंबई : ६ ऑगस्ट – १०० कोटी वसुली प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुरते अडचणीत सापडले आहे. त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा कायम आहे. ईडीने वारंवार नोटीस बजावून देखील अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय काही चौकशीला हजर राहू शकले नाही, त्यामुळे आता ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस काढल्याची माहितीसमोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने अनिल देशमुख यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही.
तसंच, अनिल देशमुख जिथे दिसतील, त्याच क्षणी अटक करण्याचे आदेश सुद्धा ईडीने काढले आहे. अनेक वेळा चौकशी बोलावून देखील अनिल देशमुख आले नाहीत, त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अनिल देशमुख प्रकरणाचा तपास सीबीआय, ईडी करत असतानाच काही दिवसांपूर्वी चौकशी अहवाल लीक झाला आणि देशमुखांना क्लीन चिट मिळाल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी सीबीआयने कारवाई करत सीबीआयच्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेला अधिकारी हा सीबीआयमध्ये सब इंस्पेक्टर पदावर कार्यरत होता.
सीबीआयचा अधिकारी अभिषेक तिवारीला चौकशी अहवाल लीक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अभिषेक तिवारी याने आयफोनसाठी हा चौकशी अहवाल लीक केला असल्याची माहिती समोर आली. चौकशी अहवाल लीक करण्यासाठी अभिषेक तिवारी याने आयफोन १२ प्रो लाच म्हणून घेतला होता.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी अभिषेक तिवारी हा अनिल देशमुख प्रकरणाच्या तपासासाठी पुण्याला गेला होता. या दरम्यान अभिषेक तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांची भेट झाली. या भेटी दरम्यान आनंद डागा यांनी चौकशी अहवाल लीक करण्यासाठी अभिषेक तिवारीला आयफोन १२ प्रो दिला होता. जो आता सीबीआयने जप्त केला असून फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवला आहे.

Leave a Reply