वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

” नाथा पुरे आता ! “

अरे , तुमच्याजवळ ईडी आहे ,
तर माझ्याजवळ सिडी आहे !
अशी धमाकेदार धमकी देणाऱ्याची मालमत्ता ईडीने जप्त केली !
पण सिडी काही अद्याप बाहेर नाही आली !
जनता सारी आता सिडीकडे डोळे लावून बसली आहे !
काय गूढ असेल बरं त्या सिडीत ?
जनतेचं कुतूहल असं वाढता वाढता वाढत आहे !
पण सिडी मात्र युती काळातील सेना आमदारांच्या राजीनाम्यांप्रमाणे अद्यापतरी खिशातच आहे !
जो त्यांना सिडी देणार होता त्याने म्हणे भाऊंना दोन कोटींची मागणी केली !
अरे ज्यांच्या बिडीकाडीचीही आता सोय नाही उरली , त्यांच्याकडून अशी मागणी, म्हणजे अगदी हद्दच झाली !
त्यामुळे ‘ नाथ हा माझा ‘, अक्षरशः अनाथ झाला आहे !
“करून बसलो काय , अन फाटक्यात पडले पाय ” ,अशी त्यांची अवस्था झाली आहे !
बरं , तिकडे ते महामहिम सुद्धा ‘ ताकास तूर’ लागू देत नाहीत !
‘बार -भाईं’च्या यादीला केव्हा मंजुरी देतात कोणास माहीत !
त्यामुळे जनता त्यांची ” नाथा पुरे आता ” म्हणून , खिल्ली उडवत आहे !
आणि काकांनी आपला ‘ मामा ‘ केल्याची , जाणीव त्यांना होत आहे !

          कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply