चाळीसगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, १५ गावांत पाणी शिरले

जळगाव : ३१ ऑगस्ट – हवामान खात्याने अलर्ट दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी आज पावसाला सुरवात झाली आहे. राज्यातील जळगाव मधील चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. या तालुक्यातील अनेक गाव पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे या तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जवळपास ५०० ते ६०० जनावरे वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही लोक वाहून गेल्याची देखील माहिती मिळत आहे. पुरामुळे तालुक्यात मोठं नुकसान झाल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
तालुक्यात जवळपास पंधरा गावांमध्ये पाणी शिरंल आहे. तसेच जणावरे वाहून गेल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. तालुक्यात अनेक गावांमध्ये अद्यापही पाणी साचलेलं आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
तालुक्यात अनेक पुल देखील पाण्याखील गेली आहेत. त्यामुळे याचा वाहतूकीवर परिणाम मोठा परीणाम झाला आहे. हे पाणी नागरी वस्तींमध्ये शिरल्यामुळं अनेक ठीकाणी बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे.
आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, स्थानिक लोकांशी माझं बोलणं झाल आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आम्ही घाटात आहोत. या ठीकाणी मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. ५०० ते ६०० गुरं पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. तर काही दगावली आहेत. तसेच सकाळपासून ३ ते ४ मृतदेह मी बघितले आहेत. त्यामुळे ८ ते १० लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व प्रशासन कामाला लागलं आहे. या पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे केल्यानंतर ते कळेल. पंचनामे करण्याच्या सुचना महसूल विभागाला केल्या आहेत. तालुक्यातील ८ ते १० गावांना या पुराचा फटका बसला आहे.

Leave a Reply