नागपूरच्या सियाची उत्तुंग भरारी

नागपूर : ३० ऑगस्ट (महेश उपदेव) – नागपूरच्या शिवाजी नगर जिमखान्याची युवा खेळाडू सिया देवधर हिने परदेशात आपल्या नावाचा झेंडा रोवून नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ती लवकरच हिंदुस्थानच्या युवा संघात चमकणार आहे, तो क्षण नागपूरासाठी महत्वाचा ठरणार आहे.
नागपूरची सिया देेवधर हिने आतापर्यंत सहा वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत, या युवा खेळाडूने एनबीएलाही आपल्या आक‘मक क्रीडाशैलीची दखल घ्यायला भाग पाडले आहे.महाराष्ट्रॉच्या इतिहासात नागपूरचे बास्केट बॉल खेळाडू आता चमकायला लागले आहे, या करीता नागपूरचे क्रीडे साठी पोशक असलेले वातावरण फायदयांचे आहे.
१९८५ मध्ये नागपूरमध्ये स्थापन झालेल्या शिवाजी नगर जिमखान्याने गेल्या ३६ वर्षात मोठी भरीव कामगिरी केली आहे, अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले आहे, छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू जिमखान्याने नागपूरला दिले आहे, छ्त्रपती पुरस्कार विजेता शत्रुघ्न गोखले जिमखान्याची धुरा सांभाळत आहे, आज घडीला ३०० ते३५० लहान मोठे खेळाडू रोज बास्केटबॉलचे धडे गिरवत आहे, या जिमखान्याचा मी आजीवन सदस्य आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.
वयाच्या आठव्या वर्षापासून शिवाजीनगर जिमखानामध्ये बास्केटबॉल खेळायला जाणार्‍या सियाने आपल्या पहिल्याच बास्केटबॉल स्पर्धेत बेस्ट प्लेयरचा पुरस्कार मिळवित, आपली झेप मोठी असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील तिची कामगिरी पाहून, बास्केटबॉल महांसंघाच्या वतीने, तिला शिष्यवृत्ती देण्यात आली. अमेरिकेच्या कॅन्सास प्रांतात लाईफ प्रेप अकादमीमधून ती बारावी करीत असून स्थानिक नेक्स्ट लेव्हल एक्लिप्स क्लबकडून ती बास्केटबॉल खेळते. याशिवाय, विविध स्तरावरील बास्केटबॉल प्रशिक्षण शिबिरांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत, पुरस्कारही मिळविले आहेत
. गेल्या वर्षी फेब‘ुवारी महिन्यात शिकागो येथे झालेल्या बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स या जागतिक स्तरावरील प्रशिक्षण कार्यक‘मात तिने सहभाग घेतला होता. सिया, देशातील केवळ तीन महिला बास्केटबॉलपटूंपैकी एक आहे जिने एनबीए इंडियाच्या तीन प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभाग तर घेतलाच शिवाय पुरस्कारही मिळविले.
दरम्यान, कॅन्सासमध्ये उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यानंतर ती भारतात नागपूरला परत आली आणि तिला बंगळुरूमध्ये होणार्‍या राष्ट्रीय चमू निवड प्रशिक्षण कॅम्पमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. जॉर्डन येथे होऊ घातलेल्या फिबा आशिया चषक स्पर्धेत देशाच्या महिला बास्केटबॉल संघात प्रतिनिधीत्व करण्याची संधी सियाला मिळणार आहे. संघनिवडीच्या या प्रक्रियेत सर्वोत्तम सोळा खेळाडूंमध्ये नागपूरच्या सिया देवधरची निवड झाली आहे, हे विशेष! तिची निवड अंतिम बारामध्ये झाल्यास, विदर्भात देशाच्या बास्केटबॉल संघात निवड झालेली ती पहिलीच युवा खेळाडू ठरणार आहे. सियाचे आईवडील श्रीश आणि स्वाती देवधर यांनी तिच्या या प्रगतीचे कौतुक करून, सार्थ अभिमान व्यक्त केला आहे.भावी वाटचालीकरीता नागपूरकरांच्या शुभेच्छा

Leave a Reply