तुमसर येथे आमदार डॉ. परिणय फुके यांची शिवभोजन केंद्राला भेट

भंडारा : ३० ऑगस्ट – संचारबंदीच्या काळात गरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा राज्य सरकारने घेतली त्या अनुषंगाने राज्यभरातील प्रत्येक शिवभोजन केंद्रावर मोफत जेवण वाटप करण्यात येत आहे. विदर्भातील तुमसर तालुक्यात मोठी धान्य बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतकरी उपहारगृहात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला शिवभोजन केंद्र मंजूर करण्यात आले. या केंद्राला भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी भेट देऊन पाहणी करून शिवभोजन केंद्राबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आणि सदर केंद्रातील कर्मचारी व कामगारांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, तुमसर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, शिवसेनेचे उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, उपतालुका प्रमुख संतोष पाठक, शाखा प्रमुख निखील कटारे, मुन्ना पुंडे, सुनील लांजेवार, नगरसेवक सुनील पारधी, संजय कुंभलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेखर सेलोकर, सहसचिव अनिल भोयर, पर्यवेक्षक मुकुल मेश्राम, निरीक्षक निशांत बोरकर, लिपिक लक्ष्मीकांत कोकोडे, पंचायत समिती माजी सदस्य बंटी बानेवार, अरुण डांगरे सह शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply