डाॅ. आंबेडकर भवनासाठी आंबेडकरी जनतेचा एल्गार

नागपुर : ३० ऑगस्ट – भारतरत्न डाॅ. आंबेडकर भवनासाठी आंबेडकरी जनता आक्रमक झाली असून, निवेदन देऊनही पालकमंत्र्यांनी आतापर्यंत काहीच कारवाई केली नाही याचा रोष आंबेडकरी जनतेत दिसून आला. आता रस्त्यावर उतारण्याशिवाय पर्याय नाही असे म्हणून आज विविध आंबेडकरी पक्ष व सदनघटनांच्या वतीने संविधान चौकातून मोर्चा काढला.
आंबाझरी तलावा लगत जो पर्यंत डाॅ. आंबेडकर भवनाची निर्मिती होत नाही त्या जागेवर विकासक कामे होवु देणार नाही अशी भूमिका आंबेडकरी समाजची असून हे आंदोलन अविरत आंदोलन सुरुच राहणार अशी घोषणा त्यांनी दिली आहे. . दरम्यान मोर्चेकरी आंबेडकरी संघटनांनी म.न.पा प्रशासन व पालकमंत्री यांचा निषेध केला .
महाराष्ट राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने लक्ष न दिल्यास नागपुर हिवाळी अघिवेशन जड़ जाणार असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की आंदोलन लोकशाही मार्गाने रस्ता रोको, जेल भरो अश्या प्रकारे सुरु राहणार. आंबेडकरी पक्ष, संघठनेच्या वतिने आयोजित आज दी.३० -८-२१ रोजी संविधान चॊकातुन मोर्च्याद्वारे आंदोलनाला सुरवात झाली.
प्रचंड घोषणा देत हातात निळे झेंडे, मागणी फलक घेवुन जिल्हाधिकारी कार्यालया कडे मोर्चा निघाला. वाहतुक विभाग कार्यालया जवळ मोर्च्याला अडवण्यात आले. जनतेचा रोष वाढला. आम्हाला पुढे जावु द्या. पुढा-यांच्या हस्तक्षेप होवुन त्याच ठिकाणि सभेला सुरवात झाली. जोरदार पावसाने हजेरी लावुन सुध्दा जनता विचलित झाली नाही. आंबेडकरी जनतेचा रोष कमी झाला नाही. शिष्टमंडळाने, मा. जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितित आरडीसी मा. कातडे यांना निवेदन दिले.
रिपाई, पिरिपा,रिपाई (आठवले)रिपाई (खोरिपा) समता सैनिक दल, भिम पँथर,(सा.स.) भिमराज की बेटी(सा.स) पश्र्चिम नागपुर भोजनदान समिती. रिपब्लिकन विद्यार्थी संघटना, साहित्यिक, वकील मंडळी, महीला, कार्यकर्ते, विध्दार्थी,भा. बॊध्द महासभा पदाधिकारी प्रमुख्याने सहभागी होते.या मोर्च्यात मोठ्या संख्येने आंबेडकरी जनतेचा सहभाग होता.
प्रा. जोगेन्द्र कवाडे, उपेंन्द्र शेंडे, भुपेश थुलकर, जयदिप कवाडे,बाळु घरडे, मनोज बंन्सोड, अरुण गजभिये,सरदार, कर्नलसींग, तारिक भाई, विस्वास पाटील, साहित्यिक धनराज प्रकाश कुंभे,, इ.मो. नारनवरे, गोविन्द वाघमारे, सोनिया गजभिये, बाळुमामा कोसमकर, कैलाश बॊंबले, राजा भाऊ नगराळे,प्रफुल बाराहाते, अनिल मेश्राम, अमृत गजभिये, दिनेश गोडघाटे, प्रेम गजभिये, यश तेलंग, राजनीति वाघमारे, संजय जिवने, निरंजन वासनिक,रमेश घरडे, अजय चव्हाण, स्मिता कांबळे, डाॅ. मनोज मेश्राम, अमन मेश्राम, धर्मपाल गजभिये, श्रीमती वर्षा मानवटकर, वनिता रामटेके, शोभा घरडे,इ. प्रामुख्याने सहभागी होते.
मोर्चा यशस्वी करण्यास बाळु घरडे, मनोज बंन्सोड, अरुण गजभिये, विस्वास पाटील,बाळुमामा कोसमकर,कैलाश बॊंबले, ओमकार अंबादे, शुभम घरडे, अमन मेश्राम, इ. अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply