अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याकडे नागपुरात ईडीचा छापा

नागपूर : ३० ऑगस्ट – शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे परब यांच्या संबंधितीत नागपूरमध्ये ईडीने छापा टाकला आहे. वादग्रस्त अधिकारी असलेले बजरंग खरमाटे यांच्या कार्यालयावर आणि ऑफिसवर छापा टाकण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या प्रकरणाशी संबंधीत नागपूरमध्ये ईडीने छापासत्र सुरू केले आहे. नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या कार्यालयात व घरी ईडीने कारवाई केली आहे. बजरंग खरमाटे हे अनिल परब यांच्या जवळचे अधिकारी समजले जातात.
परंतु, दुसरीकडे, परीवहन मंत्री यांच्या संबधीत कोणत्याही ठिकाणांवर ईडीच्या धाडी पडलेल्या नाहीत. अनिल परब यांच्या संबंधित कोणत्याही ठिकाणार ईडीच्या धाडी पडलेल्या नाही आहेत’ असं परब यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अनिल परब यांना रविवारी ईडीने नोटीस बजावली असून मंगळवारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. काही दिवसांपूर्वी सचिन वाझेनं त्याच्या जबाबात अनिल परब यांचे नाव घेतले होते. परब यांनी बीएमसी ठेकेदारांची माहिती दिली होती. याच प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply