वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

।। श्वानपुराण ।।

मित्रांनो, आज जागतिक कुत्रा दिवस आहे !
त्यानिमित्त जगातील समस्त चार पायांच्या आणि दोन पायांच्या कुत्र्यांनाही आमचा सलाम आहे !
कुत्रा हा सगळ्यात इमानदार प्राणी समजला जातो , पण ,
दोन पायांच्या प्रजातीचा मात्र भरोसा नसतो !
ते मालकाला केव्हा कसे गढ्यात घालतील याचा नेम नसतो !
असं म्हणतात, कि,काही कुत्री तर , माल एका मालकाचा खातात,
आणि काम दुसऱ्यासाठी करतात !
आणि अशाच कुत्र्यांचा हल्ली राजकारणात सुळसुळाट झाला आहे !
आजकाल ज्याप्रमाणे डॉक्टरपेक्षा कंपौंडरला , महादेवापेक्षा नंदीला,
गणपतीपेक्षा उंदराला जास्त भाव आहे !
त्याचप्रमाणे राजकारणात या कुत्र्यांना मालकांपेक्षाही जास्त भाव आला आहे !
या कुत्र्यांना चक्क चाणक्य म्हणण्यापर्यंत काही ‘वर्तस्थ ‘ पत्रकारांची बौद्धिक पातळी वाढली आहे !
असं म्हणतात, चहापेक्षा केटलीचा चटका जास्त भयंकर असतो !
तसाच या कुत्र्यांचा ‘ बाईट ‘ असतो !
यांच्या ‘बाईट’साठी प्रत्येक ‘वर्तस्थ’ पत्रकार आतुर असतो !
पण, हा ‘बाईट’ आम्हास न मिळो
म्हणून ,
तूर्तास , हे श्वानपुराण
आम्ही इथेच पूर्ण करतो !

         कवी -- अनिल शेंडे 

Leave a Reply