दिल्ली सरकारच्या देश के मेंटर्स कार्यक्रमाच्या ब्रँड अँबेसेडरपदी सोनू सूद

नवी दिल्ली : २७ ऑगस्ट – अभिनेता सोनू सूदने आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यानंतर दोघांनी मिळून एकत्रित पत्रकार परिषद घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले की, आज सोनू सूद संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनला आहे. तसंच त्यांनी दिल्ली सरकारच्या विशेष कार्यक्रमाचा ब्रँड अँम्बेसेडर होण्यासाठी होकार देखील दिला आहे.
दिल्लीचा शिक्षण विभाग लवकरच ‘देश के मेंटर्स’ कार्यक्रम सुरू करणार आहे. सोनू सूदनं त्याचा ब्रँड अँम्बेसेडर होण्यास सहमती दर्शवली आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पुढे केजरीवाल म्हणाले की,प्रत्येकजण त्याच्या घरी मदत मागण्यासाठी जातो सोनू सूद त्याला मदत करतो. आज अशी अनेक सरकारे आहेत, जी काही करू शकत नाहीत, ते सोनू सूद करत आहेत. आम्ही दिल्ली सरकारमध्ये करत असलेल्या चांगल्या कामासाठी आम्ही सोनू सूदशी बोललो आहोत.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये देशातील मार्गदर्शकांवर काम सुरू आहे. मुलं सरकारी शाळेत शिकतात. ते गरीब भागातून येत असतात. त्यांना मार्गदर्शन करणारे लोकं फार कमी आहेत. काहींना फॅशन डिझायनर, काही डान्सर आणि काही गायक व्हायचे आहे. अशी मुलं कुठे जातात? अशा परिस्थितीत, आम्ही आवाहन करत आहोत की सरकारी शाळांमधील मुलांचं मार्गदर्शक बनून मार्गदर्शन करावं.
कधीकधी मुले तणावाखाली असतात. यामुळे काही मुलं आत्महत्या देखील करत आहेत. अशा मुलांना ताणतणावमुक्त करण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी, देशाचे मार्गदर्शक कार्यक्रम सुरू केले जातील. सोनू सूद या कार्यक्रमाचे ब्रँड अँम्बेसेडर असतील, असं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं.
यावेळी अभिनेते सोनू सूद म्हणाला की, शिक्षण असावं तर ते दिल्लीसारखे असावं. देशाचा विकास शिक्षणाद्वारे होऊ शकतो. दिल्लीचे शैक्षणिक क्षेत्र सुधारले आहे. जेव्हा लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा शिक्षणावर काम झाले.
सोनू म्हणाला की, चांगल्या कुटुंबातील लोक सुशिक्षित असतात. त्यांची मुले अभियंता आणि डॉक्टर बनतात. मात्र असे काही वर्ग आहेत ज्यांना मार्गदर्शन करायला कोणी नाही. अशात एक मार्गदर्शक असणं आवश्यक आहे. आज दिल्ली सरकारने चांगले काम करण्याची संधी दिली आहे.

Leave a Reply