केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात काही लोकांचा बळी जात आहे, त्यापैकी मी एक – प्रताप सरनाईक

मुंबई : २७ ऑगस्ट – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार असा वाद सतत पाहायला मिळत आहे. अशात चौकशा अनेक नेत्यांना अटक, आरोप-प्रत्यारोप असे प्रकार समोर येत असताना आता प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप नाईक यांच्यावर देखील ईडीची कारवाई सुरू असून त्या संदर्भात त्यांनी मोठं विधान केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात काही लोकांचा बळी जात आहे आणि यापैकी मी एक आहे असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. मी आधीपासूनच सांगितलं आहे की केंद्र आणि राज्य सरकारला भांडणांमध्ये काही लोकांचा बळी गेला. त्यातला मी एक आहे. पण मला ईडीच्या अधिकाऱ्याकडून कुठल्याही त्रास झाला नाही. ते त्यांचं काम करत आहेत अशा शब्दात प्रताप सरनाईक यांनी सरकारवर टीका केली.
दरम्यान, मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीच्या कारवाईवरुन सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याची मागणीही केली होती. पण आता या विधानामुळे प्रताप सरनाईक पुन्हा चर्चेत आले आहेत.
नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) आणि टिटवाळा येथील एका जमीन व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आला आहे. सरनाईक यांची मुले विहंग व पूर्वेश तसंच, निकटवर्तीय योगेश चंडेला यांच्यावरही या प्रकरणात ठपका ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply