वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

“भोकं पडलेला फुगा ?”

काही कर्तव्यशून्य लोकांना सवयच असते आपल्याच हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची !
कजाग बाईसारखं भांडभांड भांडायची !
आपली अवस्था ” आ बैल मुझे मार “
अशी करून घेण्याची !
एक म्हण आहे, “आधी होती गावराणी
मग झाली पट्टराणी, तिचा येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना !”
त्याचप्रमाणे जेव्हा एखादा माणूस
अजिबात लायकी नसतांना
सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसतो ,तेव्हा,
त्याचं बेडुकगर्जना करणं काही थांबत नाही !
आणि ,बैलाची बरोबरी करण्याच्या नादात आपली टिचभर छाती फुगवायचं काही थांबवत नाही !
आपलं अफाट अकर्ममण्य लपवण्यासाठी त्याला आपलं शिव्या – होत्र सुरूच ठेवावं लागते !
आपल्या अपयशाचा धनी दुसऱ्या कोणाला तरी बनवावंच लागते !
पण ,अशा एखाद्या सांडाला जेव्हा दुसरा सव्वाशेर सांड भेटतो आणि त्याच्याशी त्याच्याच स्टाईलने टकरावतो !
तेव्हा त्यांच्या जुगलबंदीने जनतेची मात्र अक्षरशः ससेहोलपट होते !
एक दुसऱ्याला भोकं पडलेला फुगा म्हणतो ! तर ,
दुसरा पहिल्याला पप्पूचा हिरवा झगा म्हणतो !
पण त्यांच्या या गोटमारीत गरीब जनतेची मात्र लाही लाही होते !
आणि आधीच महामारीने त्रस्त बिचारी जनता त्राही मां ! त्राही मां म्हणते !

            कवी -- अनिल शेंडे 

Leave a Reply