वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

शुद्धीकरण !

स्वर्गीय बाळासाहेबांचा पुतळा
काल माझ्या स्वप्नात आला !
आणि आपली व्यथा व्यथित अंतःकरणाने सांगू लागला !
” काल माझ्याच सैनिकांनी मला
गोमूत्र आणि दुधाने धुतला !
वरून म्हणाले , त्यांनी मला शुद्ध केला !
खरं सांगतो , याचा मला भयंकर
संताप आला !
असं वाटलं कि फोडावी मुस्काटं एकेकाची !
पण काय करणार पुतळा होतो ना !
वाटलं सांगावं त्यांना ,” अरे गाढवांनो,
शुद्धीकरण कोणाचं करतात ?
जो बाटवून परधर्मात गेला त्याचं !
त्या अर्थाने तसं पाहिलं तर अप्रत्यक्षपणे का होईना धर्मांतरण तर तुम्ही केलंय !
टिपू जयंती काय ! अजान स्पर्धा काय ! चिष्तीचं उदात्तीकरण काय!
आपला मूळ भगवा सोडून हिरवा हातात धरला काय !
तुम्ही आता बाकी ठेवलंच काय ?
अरे नालायकांनो , मला ” टी बाळू ” म्हणणाऱ्या आणि अटक करणाऱ्या
भ्रष्टाचार्याला मिठ्या मारतांना
तुम्हाला जनाची तर नाहीच पण मनाचीही काही वाटली नाही ?
माझ्या हिंदुत्वाच्या तत्वांना आणि विचारांना तिलांजली देतानाही तुम्हाला काहीच वाटलं नाही ?
अरे वेड्यांनो, आधी तुम्ही स्वतःला शुद्ध करा !
नाहीतर त्या बांडगुळांसोबत तुम्हीही
चुळभर पाण्यात मरा !”

        कवी -- अनिल शेंडे.

Leave a Reply