युक्रेनचे विमान हायजॅक करून इराणला नेले

काबूल : २४ ऑगस्ट – युक्रेनचं एक विमान अज्ञातांनी हायजॅक केल्याचं आणि ते ईराण येथे आणल्याची माहिती युक्रेनचे उपपरराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन यांनी दिली आहे. हे विमान युक्रेनच्या नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी तेथे पोहोचलं होतं. परराष्ट्र मंत्री येनिन यांनी रशियन न्यूज एजेन्सीला ही माहिती दिली आहे.
युक्रेनचे उपपरराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन यांनी सांगितलं, की २२ ऑगस्ट रोजी आमचं एक विमान हायजॅक केल्याची माहिती मिळाली. या विमानाने युक्रेनच्या नागरिकांना बाहेर काढण्याऐवजी प्रवाशांना एका अज्ञात समूहासह घेऊन ईराणसाठी उड्डाण केलं, अशी माहिती त्यांनी दिली.
परंतु रशियन मीडिया आउटलेट इंटरफॅक्सने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये युक्रेनचं कोणतंही विमान हायजॅक न झाल्याचं म्हटलं आहे. ईराणने युक्रेनच्या या माहितीचं खंडण केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, ईराणच्या एव्हिएशन रेग्युलेटरने युक्रेनचा दावा नाकारत, युक्रेन विमान २३ ऑगस्ट रोजी रात्री इंधन भरण्यासाठी मशहद येथे थांबलं होतं. त्यानंतर युक्रेनसाठी उड्डाण करुन कीव येथे पोहोचलं असल्याचं सांगितलं.
दरम्यान, याआधी रविवारी ३१ युक्रेन नागरिकांसह ८३ लोकांना सैन्याच्या एका ट्रान्सपोर्ट विमानाने आणण्यात आलं होतं. राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन सेनेतील १२ लोकही परत आले आहेत. परंतु अद्यापदी १०० युक्रेन नागरिक काबूलमध्ये अडकले असल्याची माहिती आहे.

Leave a Reply