नागपुरातही भाजप कार्यालयासमोर शिवसैनिकांचे आंदोलन

नागपूर : २४ ऑगस्ट – नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चिपळूणमध्ये सुरु झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, ठाणे पाठोपाठ नागपूरमध्ये देखील शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नागपूरच्या धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरादर घोषणाबाजी करण्यात आली.
नागपुरातील धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर लागला पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्यावतीनं बंदोबस्त ठेवण्यात आला होता.राज्यात घडत असलेल्या घटना बघता पोलिसांनी तयारी करत बंदोबस्त ठेवला होता.
नागपूरमध्ये शिवसैनिंकानी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक कोंबड्या हातात घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते..
भाजपच्या नागपूर विभागीय कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता जमा झाले होते. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या आहेत. भाजपच्या कार्यालयासमोर कोणी शिव सैनिक येऊ नये यासाठी भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. भाजयुमोकडून शिवसैनिकांविरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.

Leave a Reply