वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सर्वोच्च अंधश्रद्धा !

जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा म्हणजे,
“माझ्या धर्मग्रंथात जे सांगितलं आहे तेच खरं आहे
आणि बाकी सर्व जग खोटं ” हा विचार आहे !
हा विचार मानवतेच्या दृष्टीने,
मानवजातीच्या अस्तित्वाच्या दृष्टीनेही
अत्यन्त अत्यंत धोक्याचा आहे !
जगात आजवर झालेल्या बहुतांश क्रूर
नृशंस नरसंहारांची बीजं या विचारात आहेत !
नालंदा तक्षशिलेच्या राखरांगोळीची बीजं याच विचारधारेत आहेत !
तरीही आजवर कोणी मोठ्यातला मोठा बुद्धीवादी , किंवा ,
स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलनवाले म्हणवून घेणाऱ्यांचीही तोंड कधी उचकटली नाहीत तिचा निषेध करण्यासाठी ! आणि,
ही अंधश्रद्धा संपविण्यासाठी !
सारेच्या सारे हरामखोर तुटून पडतात
जगातील सर्वात सहिष्णू असलेल्या ,
मानवतावादी असलेल्या ,
शांती, अहिंसा आणि सहअस्तित्वावर
प्रगाढ विश्वास असलेल्या हिंदुधर्मावर !
पण आता हे अति झालंय !
सडक्या मेंदूच्या,भाडोत्री सेक्युलरांनो,
हे चाळे आता बंद करा ! कारण,
याच अंधश्रद्धेचा फास तालिबानच्या रूपाने ,
आता तुमच्याही गळ्यापर्यंत आलेला आहे !

              कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply