वन्यप्राण्यांच्या हल्यात एकाचा मृत्यू तर एक गंभीर

गोंदिया : २३ ऑगस्ट – रानभाज्या संकलित करण्याकरिता जंगलात गेलेल्या दोन्ही समान वर वन्यप्राण्यांनी हल्ला केला यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र क्रमांक ५०७, ५११ मध्ये घडली. राधेश्याम राणे (४५) रा. ताणुटोला असे मृतकाचे तर पतीराम ऊईके रा. जांभळी असे जखमी इसमाचे नाव आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने जंगल परिसरात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवलेले आहेत या रानभाज्या संकलित करून ग्रामीण भागातील नागरिक शहरातील बाजारपेठेत विक्री करून चार पैसे कमवितात. शेतीची व अन्य कामे नसल्याने सध्या हाच त्यांचा व्यवसाय झाला आहे. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी राधेश्याम राणे हे त्यांच्या पत्नी सोबत वनपरिक्षेत्र क्रमांक ५०७ मध्ये रानभाज्या संकलित करण्याकरिता गेले होते. दरम्यान झुडपात घडून बसलेल्या दोन रानडुकरांनी राधेशाम यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच राधेशाम यांचा मृत्यू झाला.
पतिराम ऊईके हे वनपरिक्षेत्र क्रमांक ५११ मध्ये रानभाज्या संकलित करण्यासाठी गेले होते, दरम्यान त्यांच्यावरही अस्वलाने हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना गोंदिया येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच जांभळीचे वनक्षेत्राधिकारी एस. एफ. देशमुख, आरएफओ नंदेश्वर, बीट प्रभारी घासले, वन कर्मचारी केंद्रे, कटरे यांनी घटनास्थळी वाचून पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणी करीता रुग्णालयात पाठविण्यात आले.

Leave a Reply