पत्रभेटमध्ये विविध क्षेत्रातील ‘रिअल हिरोज’ लावली उपस्थिती

नागपूर : २० ऑगस्ट – पत्रभेट संपादक मंडळाच्यावतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘रिअल हिरोज’ या विशेष आभासी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला. त्यात मत लोकमत मुंबईचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, सकाळ पुणेच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर, तरुण भारत नागपूरचे मुख्य वार्ताहर पराग जोशी व देशोन्नती गडचिरोलीचे आवृत्तीं प्रमुख प्रा. अनिल धामोडे यांचा त्यात समावेश होता. पत्रकारने आपले ‘व्‍ह्यूज’ त्यांच्या ‘न्यूज’ मध्ये आणू नये. वैयक्तिक मत आणि बातमी याची गल्लत केल्याने निखळ पत्रकारिता प्रभावित होते असे मत या मान्यवरांनी व्यक्त केले. दुस-या दिवशीच्या सत्रात उप-मनपा आयुक्ता बाबासाहेब राजळे, ज्येष्ठ अॅड. किशोर कांत अँटी करप्शन ब्यूरोचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद तोत्रे यांचा सहभाग होता.
नेवल मटेरियल रिसर्च टेक्नोलॉजीमध्ये कार्यरत शास्त्रज्ञ विनय देशमुख, दत्ता मेघे कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूरच्या प्राचार्य डॉ. वैशाली तेंडोलकर, विशिष्ट सेना सेवा मेडल प्राप्त निवृत्ती मेजर जनरल अनिल बाम यांचा समारोपीय सत्रात सहभाग होता. त्यांनी देशाचे स्वातंत्र्य हे सुरक्षिततेचे कवच झाल्यास ते आनंदाने अनुभवले जाऊ शकते. त्यामुळे देशाची सुरक्षितता ही स्वातंत्र्याइतकीच महत्वाची असते, असे मत मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेकरिता प्रसन्न बारलिंगे, डॉ. अमर देशपांडे, मंगेश बरबडे, स्मिता काटेकरए मोहन बरबडे व प्रा. संजय देशकर यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply