भाजपची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण – संजय राऊत

मुंबई : १८ ऑगस्ट – शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. जन आशीर्वाद ही तर तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात… ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं.
भाजपचा ग्राफ कोसळतोय
एका सर्व्हेत देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश झाला आहे. उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक सुद्धा या यादीत आहेत. उद्धव ठाकरेही आहेत. पण भाजपचा एकही लोकप्रिय मुख्यमंत्री या टॉप फाईव्हमध्ये नाहीये, याचं आश्चर्य वाटतं. खरं तर त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ज्या प्रकारे देशात भाजपचा ग्राफ कोसळत आहे. त्याचाही हा एक परिणाम आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात नेहमी राजकारणाच्या पलिकडे जाऊन काम केलं आहे. खासकरून कोरोना काळात. ज्या प्रकारे त्यांनी मुंबईसह संपूर्ण राज्याला कंट्रोल केलं. त्यामुळे ते राज्यात नंबर वन आहेत. हळूहळू त्यांचा ग्राफ वाढेल आणि या यादीत ते पहिले ठरतील. आणखी भाजपचे मुख्यमंत्री या यादीत स्थान आणू शकले नाहीत. आता भाजपवाले या पोलवर आक्षेपही घेतील. नावंही ठेवतील. जेव्हा तुमची नावं येत होती तेव्हा पोल योग्य होता. आता आमच्या मुख्यमंत्र्यांचं नाव येत असेल आणि ममता बॅनर्जीचं नाव येताच तुम्ही प्रश्न विचारायाल सुरुवात कराल. हा पोलच आहे आणि जनतेचा पोल आहे, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे प्रत्येक सर्व्हेत टॉप टेन आणि टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. आता ते टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. लवकरच ते टॉप वन होतील. आमचे राजकीय विरोधक काहीही म्हणून द्या. ते म्हणतील हा कसला पोल? असा पोल असतो का? ते काहीही म्हणून द्या. जेव्हा तुमच्याबाबतीत पोल येत होते, तेव्हा तुम्ही त्याचे ढोल आणि झांजा वाजवत होता. आता आम्हीही फटाके फोडू. आमचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय नेतृत्व आहे. महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आणि गर्व वाटावं असं नेतृत्व आहे. त्यांचं काम उत्तम चालू आहे. विकासाचं आणि कोरोना नियंत्रणाचं काम चांगलं चालू आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री घरी बसूनच असल्याची त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती. या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. घरी बसून टॉप पाचमध्ये येता येतं का? ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, स्टॅलिन हे टॉप फाईव्हमध्ये आले ते घरी बसून आले का? याचं उत्तर विरोधकांनी दिलं पाहिजे, असं सांगतानाच त्याकाळात प्रत्येकाना वर्क फ्रॉम होमच करायचं होतं. तुम्ही उकीरडे फुंकत फिरलात कारण नसताना, त्याला आम्ही काय करणार, असा हल्लाही त्यांनी चढवला.

Leave a Reply