मागील काळात सर्वच सरकारने आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले – राजेश टोपे

बुलडाणा : १७ ऑगस्ट – मागील काळात सर्वच सरकारने आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले आहे. राज्याचा स्थूल उपन्नाच्या (जीडीपी) ५ टक्के निधी आरोग्यासाठी खर्च करणे आवश्यक असतांना केवळ १ टक्का निधी आरोग्यासाठी खर्च करण्यात येत होते. जास्त खर्च एरिगेशन, बांधकाम आणि युडीसाठी खर्च करण्यात येत होते. मात्र आता कोरोनामुळे सरकारचे डोळे उघळले आहे आणि आम्ही आरोग्याच्या दृष्टिकोणातून सगळ्या पद्धतीने खर्च करत आहे, असा सुतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ते बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव येथे सिल्वर सिटी रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या एमआरआय आणि सिटीस्कॅनच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
लसीकरणाला आपल्याला महत्व द्यायचे आहे. पुढच्या आठवड्यात आपण लसीकरणात नंबरवन होतो. मात्र लोकसंख्येनिहाय जास्त लस उत्तरप्रदेशाला मिळते आहे. म्हणून सध्या एक नंबरवर उत्तर प्रदेश आहे. आपण नेहमी लसीकरणामध्ये एक नंबर आहोत आणि लसीकरण हेच सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला रामबाण उपाय आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री या नात्याने सगळ्यांना आवाहन करेल, ग्रामीम भागाच्या लसीकरणाला आपण महत्व द्या, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
आरोग्य विभागातील एकही जागा रिक्त राहता कामा नये, मग तो वार्ड बॉय असो, शिपाई असो, वॉचमेन असो, स्पेशालिस्ट असो,की मेडिकल ऑफिसर असो नाहीतर सुपर स्पेशालिस्ट असो सगळ्यांची नियुक्ती करणे सुरू आहे, असेही टोपे म्हणाले.
आरोग्य विभागाच्या दृष्टीकोनातून अनेक चांगले निर्णय घेतले जात आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिथे उपजिल्हा रुग्णालय आहे. त्या त्या ठिकाणी सिटीस्कॅन आणि एमआरआय सुविधा राज्य शासन दारिद्रय रेषेखालील नागरिकांना 100 टक्के मोफत देणार आहे, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

Leave a Reply