नागपुरात पावसाचे दमदार पुनरागम, धुवाधार पावसाने मनपाचे पितळ उघडे

नागपूर : १७ ऑगस्ट – नागपूर शहरात पावसाचे दमदार पुनरागम झाले आहे, काळ रात्री आलेल्या पावसाने आज सकाळीही उसंत घेतली नाही. दुपारी आणि सायंकाळीही पावसाने दमदार हजेरी लावली. नागपूर शहरात पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून महानगरपालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. पण नागपुरात आज केवळ दीड तास झालेल्या पावसात नागपूर मनपाचे पितळ उघडे पडले आहे. नागपुरात आज दिवसभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात दीड ते दोन फूट पाणी साचलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने नागपुरात पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. दरवर्षी नागपुरात पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्च करुन साफसफाई केली जाते. मात्र आज झालेल्या पावसामुळे मनपाचं पितळ उघडं झालं आहे. दीड तासांच्या मुसळधार पावासाने नागपुरातील सखल भागात पाणी साचलं आहे. नागपुरात वेस्ट हायकोर्ट रोडवरील काचीपुरा भागात दीड ते दोन फुट पाणी साचलं आहे. याचा मोठा मनस्ताप लोकांना सहन करावा लागत आहे.
नागपूर शहरातील मुख्य मार्ग आणि अंतर्गत मार्गांच्या बाजूला, फुटपाथलगत असलेले नाले बुजलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होते. त्यामुळे दरवर्षी नागपुरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते.
दरम्यान गेल्यावर्षी नागपूरचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाले सफाईंच्या कामाचे आदेश दिले होते. नागपुरात पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर पाणी जमा होते. यंदा पावसाचे पाणी जमा होऊ नये, त्याचा सहजतेने निचरा व्हावा यासाठी नालेसफाई करण्यात आली होती.

या निर्देशानुसार गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात मोठया प्रमाणात नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार 10 झोनमधील रस्त्यालगत ५८२.८४ किमीपैकी आतापर्यंत ५३७.१७ किमी पावसाळी नाल्यांची सफाई पूर्ण झाली. तर उर्वरित ४५.६७ किमीची सफाई पूर्ण करण्यात आली होती.

Leave a Reply