सेल्फी काढण्याच्या नादात दोन सख्ख्या भावांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू

भंडारा : १६ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गोसीखुर्द धरणावर पर्यटनाला गेलेल्या दोन सखे भाऊ सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून बुडाल्याची घटना घडली. मंगेश मधुकर जुनघरे (३७ वर्ष) आणि विनोद मधुकर जुनघरे (३५ वर्ष) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावं आहेत. दोघेही नागपूर जिल्हातील उमरेड येथील रहिवासी होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त पाच मित्र भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरण क्षेत्रात फिरायला आले होते. घटनेनंतर पोलीस ठाणे पवनी चे पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वात स्थानिक मच्छिमारांना बोलावून शोधकार्य सुरू केले, मात्र अजूनपर्यंत त्यांचे मृतदेह मिळालेले नाहीत. पोलिसांचे शोधकार्य सुरु आहे. एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्यानं उमरेडमध्ये शोककळा पसरली आहे.
गोसेखुर्द धरणावर मंगेश जुनघरे सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा धाकटा भाऊ विनोद जुनघरे यानेही पाण्यात उडी घेतली. मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Leave a Reply