सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवर एक महिला व एका पुरुषाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नवी दिल्ली : १६ ऑगस्ट – राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवर स्वत:ला पेटवून घेत दोन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. यामध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि पुरुषाने न्यायालयाच्या गेट क्रमांक डी मधून आता घुसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, योग्य ओळखपत्राशिवाय आत जाण्यास सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर, आत प्रवेश न मिळाल्यानं संतापलेल्या या दोघांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गेटजवळ स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
मात्र, सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे या दोघांचेही जीव वाचलेत. आग विझवल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दोघांना पोलिसांच्या गाडीतून तत्काळ राम मनोहर लोहियारुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पोलिसांना घटनास्थळी एक ज्वलनशील पदार्थाची बाटलीही सापडली आहे. याच बाटलीतून आणलेला पदार्थ अंगावर ओतून घेत या दोघांनी स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला.
या दोघांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याची मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Reply