पालकमंत्र्यांनी कार्यकर्ताच्या टपरी वर केला नाश्ता

नागपूर : १६ आँगस्ट – स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपले विविध कार्यक्रम पूर्ण करुन जेंव्हा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डाँ.नितीन राऊत परत निवासस्थानी जात होते तेव्हा त्यांनी आपल्या कार्यकर्तांच्या रस्त्या शेजारी असलेल्या नाश्ताच्या टपरीवर नाश्त्याचा आस्वाद घेतला.
संतोष खडसेच्या टपरीवर पालकमंत्र्यानी नाश्ता केला आणि संतोषची आस्थेने विचारपुसही केली.
संतोषची मुलगी वेदिताशी बोलून तिच्या अभ्यासाची विचारपुस केली आणि शिकून मोठी अधिकारी हो असा पालकत्वाच्या भूमिकेतून सल्ला दिला.
एरवी नेत्यां विषयी जनसामान्यांची सकारात्मक भूमिका दिसून येत नाही मात्र त्याला डॉ.नितीन राऊत हे अपवाद आहेत. कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा आहे याची जाणीव डॉ.राऊतांना आहे.
पालकमंत्र्यांनी कामठी रोडवरील टेका नाका चौक येथील संतोष पोहावालाच्या टपरी वर तर्री पोह्याचा आस्वाद घेतल्याने परिसरात सर्वत्र संतोषच्या टपरीची चर्चा होती.
गोर गरीब निराधार व्यक्तीच्या अडीअडचणीसाठी आमचे आमदार रात्री-बेरात्री मदत करतात आणि कार्यकर्त्यांसाठी मदतीला धावून जातात असे संतोष म्हणाला.

Leave a Reply