ग्रामीण गृहनिर्माण योजना यशस्वी करू – डॉ.नितीन राऊत

नागपूर : १६ ऑगस्ट – देशात २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे हे धोरण राबविले जात आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनही प्रयत्नशील आहे. नागपूर जिल्ह्यातही शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात एम.एम.आर.डी.ए. मिहान तसेच ग्रामीण भागातील महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री आवाज योजना आहे. तसेच राज्य शासन शबरी व रमाई या दोन राज्य पुरस्कृत योजना राबविते. जेणेकरून ग्रामीण भागातील एकही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहता कामा नये. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात समाधानकारक काम झाले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, नागपूरच्या माध्यमातून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरात ज्या तालुक्यांनी उत्कृष्ट काम केले, त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कारही देण्यात आले. या सर्व यंत्रणेचे डॉ.नितीन राऊत यांनी कौतुक केले. भारताच्या ७५ व्या स्वतंत्रता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत उत्कृष्ट काम करणारे तालुके, प्रभाग व ग्रामपंचायत अशी वर्गवारी करण्यात आली होती. त्यात प्रधानमंत्री आवाज योजनेत तालुका स्तरीय प्रथम- रामटेक, द्वितीय-काटोल, तृतीय-पारशिवनी तसेच प्रभागस्तरीय प्रथम-बडेगाव (ता.सावनेर), द्वितीय-नगरधन (ता.रामटेक), तृतीय-येनवा (ता.काटोल) त्याचप्रमाणे ग्रामपंचायतस्तरीय प्रथम-महालगाव (ता.भिवापूर), द्वितीय-साळवा (ता.कुही) तर तृतीय- खापा (न) (ता.सावनेर) यांना सन्मानित करण्यात आले. राज्य पुरस्कृत तालुकास्तरावर प्रथम- ता.सावनेर, द्वितीय-कुही, तृतीय- पारशिवनी तसेच प्रभागस्तरीय प्रथम- मांढळ (ता.कुही), द्वितीय- वाकोडी (ता. सावनेर), तृतीय- तेलकामठी (ता.कळमेश्वर) त्याचप्रमाणे ग्रामपंचायतस्तरीय प्रथम- तितूर (ता. कुही), द्वितीय- रायवाडी (ता.सावनेर), तृतीय- चिचाळा (ता.भिवापूर) यांना अनुक्रमे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी या योजनेंतर्गत भरीव व शंभर टक्के काम पूर्ण करण्यात येईल, असेही मत डॉ.नितीन राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Reply