संजय राठोडांच्या अडचणीत वाढ, चौकशीसाठी एसआयटी यवतमाळात दाखल

नागपूर : १४ ऑगस्ट – शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल. संबंधित महिलेल्या आरोपांनंतर संजय राठोड यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषद घेऊन आपली बाजू मांडली होती. यावेळी त्यांनी माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी कोणीतरी जाणुनबुजून मला या सगळ्यामध्ये गोवत असल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे तर संजय राठोड यांनी स्वत:हून याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.
संजय राठोड यांनी आपल्याला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून धमक्या आल्याचे म्हटले होते. त्यामुळे याप्रकरणाच्या चौकशीसाठी आता सायबर सेलचीही मदत घेतली जाणार आहे. महिलेनं केलेली तक्रार आणि संजय राठोड यांना मोबाईलवर आलेल्या एसएमएसची चौकशी होईल. त्यामुळे आता या चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मी एका संस्थेचा प्रतिनिधी होतो. शिवपुरी येथे या संस्थेच्या माध्यमातून आश्रम शाळा सुरू आहे. या शाळेतील तीन कर्मचारी सातत्याने गैरहरज राहिल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. हे प्रकरण हायकोर्टात गेलं. त्यानंतर संस्थेने मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती पदे भरण्याची परवानगी घेऊन तात्पुरती पदे भरली. तशी जाहिरात दिली होती. एका शिक्षकाचं प्रकरण झालं. त्याने सहायक आयुक्तांकडे राजीनामा दिला. 13 एप्रिल 2017 मध्ये राजीनामा दिला. नंतर हे प्रकरण नव्हतं. पण नंतर त्या शिक्षकाचे नातेवाईक आले आणि नोकरीवर घेण्याची विनंती होते. पण कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने तुम्हाला नोकरीवर घेऊ शकत नसल्याचं त्यांना मी सांगितलं. हवं तर कोर्टात जा असं त्यांना सांगितलं, असं ते म्हणाले.

Leave a Reply