कारने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

गोंदिया : १४ ऑगस्ट – अर्जुनी मोर तालुक्यातील नवेगांव/बांध वरून स्व गावी पळसगाव ला जात असलेल्या मोटरसायकला समोरून येणाऱ्या फोर्ड गाडी ने धडक दिल्यामुळे शैलेश नामदेव भोयर वय २४ वर्ष राहणार पळसगाव तालुका देवरी यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेमध्ये अजय सोविंदा मरस्कोल्हे ( २१ ) व विलास भिवा कोवे (२८) रा. पळसगाव हे गंभीर जखमी झाले.
जखमींना पुढील उपचारासाठी गोंदियाला रेफर करण्यात आले असून मृतक शैलेश त्यांच्या पार्थिवावर ग्रामिन रूग्नालय नवेगांवबांध येथे उत्तरीय तपासणीनंतर पार्थिव कुटुंबीयांना देण्यात आले .सदर घटना दुपारी अडीच वाजता घडली असून पुढील तपास नवेगांवबांध पोलीस स्टेशनचे पी एस आय अशफाक शेख करीत आहेत.

Leave a Reply