चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीने केली हत्या

नागपूर : १३ ऑगस्ट – पती वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने दाम्पत्यात भांडण झाले. या भांडणात पत्नीने कुऱ्हाडीने घाव घालून पतीची हत्या केली. ही घटना काटोल पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या खंडाळा हेटी येथे घडली.
फुलवंती सुकलसिंग सकोम (वय ४४) रा. खंडाळा हेटी असे आरोपी पत्नीचे तर सुकलसिंग मखनसिंग सकोम (वय ४९) असे मृतक पतीचे नाव आहे. सुकलसिंग हा फुलवंतीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यामुळे ती त्रस्त झाली होती. रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास दोघांचेही भांडण झाले. राग अनावर झाल्याने फुलवंतीने घरातील कुऱ्हाड घेतली व पतीच्या डोक्यावर, मानेवर सपासप वार करून त्याची हत्या केली. घटनेची माहिती उपसरपंच हेमेंद्र मुरलीधर चरडे (वय २९) यांना समजताच त्यांनी ही माहिती काटोल पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात भादंवि कलम ३0२ अन्वये गुन्हा नोंदवून तिला अटक केली. तिच्या घरातून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली.

Leave a Reply