शाळांचे आर्थिक प्रश्न सुटल्याशिवाय शाळा सुरु करणार नाही – महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

नागपूर : १२ ऑगस्ट – कोविड काळात शाळ बंद असल्याने तसेच शाळा व्यवस्थापना- संदर्भातील आर्थिक प्रश्नांसहित अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने शाळा सुरु करणे शक्य नसल्याचे रवींद्र फडणवीस, सचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांनी सांगितले. आज नागपूर महिला महाविद्यालय, नंदनवन येथे अमरावती विभागातील संस्था चालकांचे प्रतिनिधी आणि नागपूर विभागातील संस्थाचालकांचे प्रतिनिधीयांची संयुक्त सभा झाली. त्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मंडळातर्फे संस्थांच्या अनेक प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यात करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान पाच प्रमुख मागण्यांबद्दल त्यांनी या पत्र परिषदेत माहिती दिली.
शालेय शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या मुद्यांबद्दल त्यांनी यावेळी सांगितले की, वेतनेत्तर अनुदान वर्ष २००९ पासून थकीत आहे, त्या बाबतशासनाने निर्णय घ्यावा अशी पहिली मागणी असल्याचे ते म्हणाले . तसेच वर्ष २०१२ पासून शिक्षक भरती बंद आहे. २०१७ मध्ये दिलेल्या परवानगी मध्ये पूर्ण शिक्षक भरती झाली नाही कारण त्यावेळी अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते.त्यामुळे वादग्रस्त पवित्र पोर्टल रद्द करावे आणि संहितेनुसार शालेय व्यवस्थापनाला रिक्त पदांची भरती करू द्यावी अशी दुसरी मागणी असल्याचे ते म्हणाले.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रद्द केली आहेत त्यामुळे अत्यावश्यक असे शिपायाचे पद अनेक शाळांमध्ये नाही. त्यामुळे वेतनेत्तर अनुदानातून जर या पदांचा पगार देण्यात येणार नसेल तर या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार कोण देणार हा प्रश्न असल्याने संबंधित जीआर रद्द करावा अशी तिसरी मागणी देखील करण्यात आली आहे.
माध्यमिक शाळांमध्ये ५वी चे वर्ग चौथीला जोडण्यास सांगितले आहे या संबंधीचा जीआर रद्द करावा अशी चौथी मागणी करण्यात आली असून राज्यातील घोषित व अघोषित विनाअनुदानित शाळांना अनुदानावर ताबडतोप आणा व अनुदानावर आलेल्या शाळांचे पुनर्तपासणी चे आदेश हे अन्यायकारक असल्याने ते रद्द करा अशी पाचवी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले
तत्पूर्वी राज्य सरकार तर्फे १७ ऑगस्ट पासून वर्ग ५ ते ८ आणि ९ वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा जीआर काढण्यात आला होता, तो आज रद्द करण्यात आला.

Leave a Reply