माझ्या ५५ वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी असं कधीच पाहिलं नव्हतं – शरद पवार

नवी दिल्ली : १२ ऑगस्ट – राज्यसभेत घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर विमा विधेयकावर चर्चा सुरू झाली. त्याला विरोधकांनी विरोध केला असता संसदते महिला खासरांना धक्काबुक्की करण्यात आली. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतपा व्यक्त केला आहे. माझ्या ५५ वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी असं कधीच पाहिलं नव्हतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या ५५ वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी असं कधीच पाहिलं नाही. राज्यसभेत महिला खासदारांना धक्काबुक्की झाली. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं. बाहेरच्या 40 हून अधिक पुरुष आणि महिलांना सभागृहात आणलं गेलं. हे वेदनादायी आहे. हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असं पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही या प्रकारावरून केंद्रावर हल्ला चढवला आहे.संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने जी धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला ही घटना अशोभनीय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संसदेचे कामकाज दोन दिवसाअगोदर स्थगित करण्यात आले. याचा अर्थ केंद्रसरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत होते. पेगॅसस प्रकरण, शेतीचा कायदा असेल, जातनिहाय जनगणना असेल या सर्व प्रश्नांवर चर्चा न करता किंवा त्याचे उत्तर न देता संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचा अर्थ संसदेत कोणतेच उत्तर द्यायचे नाही असे धोरण सरकारचे होते, असे मलिक म्हणाले. महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला. लोकशाहीत अशाप्रकारची घटना योग्य नाही. यावर लोकसभा अध्यक्ष व राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली परंतु त्यांनी सरळ- सरळ केंद्रसरकारला याप्रकरणी विचारणा करण्याची गरज होती. मात्र त्यांनी राजकीय दबावामुळे तसे केले नसावे, असेही त्यांनी सांगितलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला. ५५ वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कोणत्याही सभागृहात असं चित्रं पाहिलं नाही. हे पवारांसारख्या नेत्याला अस्वस्थतेतून बोलावं लागलं. माझ्याशी बोलले ते. मीडियाशी बोलले. ते फार अस्वस्थ होते. ज्यांनी संपूर्ण हयात संसदीय राजकारणात घालवली आहे ते सर्व नेते अस्वस्थ होते, असं राऊत म्हणाले.

Leave a Reply