बिबट्यांना दगड मारून जखमी करणाऱ्यांची तक्रार दाखल, होणार चौकशी

भंडारा : १२ ऑगस्ट – नैसर्गिक अधिवासात शांतपणे फिरणाऱ्या दोन तरुण बिबटय़ांना दगड मारुन जखमी करण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्य़ातील गोबरवाही ते डोंगरी बुजरुक (माईन) रस्त्यावर घडला. दरम्यान, या घटनेची तक्रार भंडारा वनविभाग व पोलीस विभागाकडे करण्यात आली असून त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. या प्रकारामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रि या उमटल्या आहेत.
रेल्वे अंडर ब्रिजच्या बाजूला झाडावर दोन बिबट बसले होते. झाडावर खालून वर आणि वरून खाली असा त्यांचा खेळ सुरू होता. त्याचवेळी रस्त्याने महिंद्राचे स्कार्पिओ वाहन जात होते. या वाहनात असणाऱ्या पाच जणांना हे बिबट दिसले. त्यांनी वाहनातून उतरून बिबटय़ांकडे पाहत आरडाओरडा आणि गोंधळ सुरू केला. बिबटय़ांना तेथून हुसकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे बिथरलेले बिबट झाडावरून खाली उतरत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसताच पुन्हा त्यांच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत जखमी झालेले दोन्ही बिबट जंगलाच्या दिशेने पळाले. बिबटय़ांना त्रास देणाऱ्यांमध्ये गोबरवाही पोलीस दलाचे शिपाई, गोबरवाही येथील वीज स्थानकाचा सुरक्षारक्षक, सीतासावंगी येथील डीएव्ही मोईल शाळेच्या मुख्याध्यापकांचा वाहनचालक यांचा समावेश आहे. यातील एकाने याची ध्वनीचित्रफित काढली आणि समाजमाध्यमांवर टाकली. ‘ये हम और ये हमारे शिकारी’ यासारखे संवाद फे कत अतिशय क्र ुरपणे ते दगडफे क करत असल्याचे या ध्वनीचित्रफितीतून स्पष्ट होते. राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांच्या अधिकृ त व्हाट्सअप समूहावर ही चित्रफित येताच भंडाऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक शाहीद खान व नदीम खान यांनी ही ध्वनीचित्रफित भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव व उपवनसंरक्षक एस.बी. भलावी यांना पाठवली.
हा गैरप्रकार करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून के ली. दरम्यान, ही ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारीत होताच वन्यजीवप्रेमींकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.

Leave a Reply