सीईटी रद्द करण्याचा निर्णय झाला असला तरी शिक्षण कुठंही थांबणार नाही – बच्चू कडू यांची ग्वाही

पुणे : ११ ऑगस्ट – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अकरावी सीईटीच्या मुद्यावर हायकोर्टानं हस्तक्षेप केला. हायकोर्टाचा असा निर्णय येईल, असं वाटलं नव्हतं, असं शिक्षण राज्यमंत्री म्हणाले.अकरावीची सीईटी रद्द करण्याचा निर्णय झाला असला तरी शिक्षण कुठंही थांबणार नाही. अकरावीच्या प्रवेशांना कुठेही अडचण येणार नाही, गरज पडल्यास जागांची संख्या वाढवू, असं बच्चू कडू म्हणाले. एकाही मुलाला प्रवेश मिळला नाही असं होणार नाही, असंही ते म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या सीईटीचे शुल्क भरलं असेल ते त्याला परत मिळेल, तो त्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बच्चू कडू यांनी पालकांनी शासकीय शाळांना पालकांनी प्राधान्य द्यावं, असं आवाहन केलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलं खासगी शाळेत शिकली यासंदर्भात विचरालं असता त्यांच्या मुलांचे मला सांगू नका, माझा मुलगा नगरपरिषदेच्या शाळेत शिकतोय, असं बच्चू कडू म्हणाले.
महाराष्ट्र सरकारनं १७ ऑगस्टपासून ग्रामीण भागात ५ वी ते ७ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ चे वर्ग सरु करण्याचा निर्णय घेतलाय. यासंदर्भात विचारलं असता आपण शाळा सुरू करण्यास प्रयत्न करतोय. कोरोना कधी जाईल हे सांगणारा भविष्यकार ही शोधतोय तो मिळत नाही, असं बच्चू कडू म्हणाले. आपण ऑनलाइन शिक्षण सुरूच ठेवतोय, पर्याय सांगा, असंही ते म्हणाले. बैठका घेऊन आता आम्हाला वीट आलाय. ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम आहेत, श्रीमंताची मुलं शिकली गरिबाची राहून गेली. विद्यार्थ्यांमध्ये मोठी विषमता निर्माण झालीय जगताला सगळ्यात मोठा मूर्खपणा, जो आम्ही केला, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
महाराष्ट्र वगळता बाकीच्या राज्यांची शिक्षणांची बेकार परिस्थिती आहे. आपण विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले. तर, इतर राज्यांनी मुलांच्या आरोग्याचा विचार न करता शाळा सुर करण्याला प्राधान्य दिले, असं बच्चू कडू म्हणाले.
कोरोनाच्या काळात शाळांच्या फीवरुन पालक आणि शिक्षण संस्था यांच्यात संघर्ष सुरु झाल्याचं दिसून आलं होतं. बच्चू कडू यावर बोलताना म्हणाले की,
आमचं प्रशासन सगळं हात मिळवलेले आहे, प्रशासन त्यांच्या बाजूने उभं राहतं. शाळां मोठ्या नेत्यांच्या, राजकीय नेत्यांच्या आहेत, म्हणून कारवाई होत नाही, त्यांना भीती वाटते. अधिकाऱ्यांची कार्यक्षमता संपलीय, त्यामुळे कायदा बदलण्याचा विचार करतोय. शिक्षण संस्थांची दरोडेखोरी आणि व्यावसायिक म्हणून भूमिका आहे. त्यामुळे वेळ आली तर सरकारच्या विरोधात लढू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. वेळ आली तर मंत्र्यांना ही इंगा दाखवू, आठ संस्थांवर कारवाई केलीय, असंही शिक्षण राज्यमंत्र्यांनी सांगितलं.
पालकांनी नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा बोगस आहेत, असं समजू नये. तिथं शिकणारी मुलं शिकली नाहीत का? अधिकारी झाली नाहीत का?, असा सवाल बच्चू कडू यांनी पालकांना केला. पालकांनी अभियान म्हणून पाहिले पाहिजे आणि सरकारी शाळांना सहकार्य केले पाहिजे. खासगी संस्थांची मक्तेदारी वाढलीय, ते कमी झाली पाहिजे, यासाठी पालकांनी भूमिका बदलली पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.
५० टक्केच्या वर मुलं शासकीय शाळेत शिकत आहेत. फक्त ब्रेकिंग दाखवतात, माध्यमातून सरकारी शाळांबद्दल कधी चांगलं दाखवलं गेलं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलं खासगी शाळेत शिकली यासंदर्भात विचरालं असता त्यांच्या मुलांचे मला सांगू नका, माझा मुलगा नगरपरिषदेच्या शाळेत शिकतोय, असं बच्चू कडू म्हणाले.

Leave a Reply