वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

भारतीयाचे अमेरिकनास उत्तर …

एक अमेरिकन भारतीयासमोर
डिंगा मारत होता !
भारताला तुच्छ लेखायचा
यत्न करत होता !
म्हणाला, जेव्हा आमचा माणूस
चंद्रावर गेला होता
तुमचा भिकारी भारत आमचा
मिलो खात होता !

भारतीय म्हणाला “,बापू,
जास्त डिंगा नको मारू
जेव्हा तुम्ही जंगलामधे
नंगे हिंडत होता !
माकडसारखे झाडाचा
पाला खात होता !
तेव्हा आमचा वाल्मिकी
रामायण लिहीत होता !

आजही तुमच्या अमेरिकेत
आमचाच बोलबाला आहे
मोठमोठ्या कँपन्यांचे
सीईओ आमचेच आहेत
आम्ही होतो निद्रिस्त म्हणून
चालली ठाकुरकी तुमची !
पण येणाऱ्या काळावर मात्र
मुद्रा असेल आमची !

       कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply