डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली संघ मुख्यालयाला भेट

नागपूर : ७ ऑगस्ट – भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले होते. यादरम्यान त्यांनी महाल स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी त्यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एका कार्यक्रमासाठी डॉ. सुब्रमण्यम स्वामी नागपुरात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी रा. स्व. संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. येथे सरसंघचालकांशी त्यांनी चर्चा केली. पेगॅसस प्रकरणासंदर्भात स्वामी यांनी मांडलेली भूमिका आणि कर्नाटकात झालेल्या नेतृत्व परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर स्वामी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. स्वामी आणि रा. स्व. संघ यांच्यात अनेक वर्षांपासून स्नेहाचे संबंध आहेत. याचमुळे सुब्रमण्यम स्वामी यांनी २0१३ मध्ये आपल्या पक्षाचे भाजपात विलीनीकरण केले होते. त्यापूर्वी २0१३ मध्ये स्वामी यांनी नागपुरात येऊन सरसंघचालकांची चर्चाही केली होती. त्यानंतर आता दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेबाबत अधिक तपशील कळू शकला नाही. मात्र, कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलण्यात आला. यानंतर स्वामी आणि सरकार यांच्या भूमिकांमध्ये अंतर पहायला मिळाले. पेगॅसस हेरगिरीप्रकरणी स्वामी यांनी अमेरिकेच्या वॉटरगेट प्रकरणाशी तुलना करीत काही प्रश्न उपस्थित केले होते.

Leave a Reply