महाराष्ट्रात भेटीवर बंधन नाही – देवेंद्र फडणवीस

नागपूर : ०६ ऑगस्ट – मुंबई महापालिकाचा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगली आहे. पण ‘महाराष्ट्रात भेटीवर बंधन नाही जर आणि तर याला राजकारणात महत्त्व नाही’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गुगली टाकली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील कृष्णकुंज निवास्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
‘चंद्रकांतदादा आणि राज ठाकरे यांची नाशिकमध्ये भेट झाली होती. तेव्हा त्यांनी भेटीसाठी निमंत्रण दिलं होतं. चंद्रकांतदादा यांनी त्यांच्या भाषणाची ॲाडिओ क्लिप ऐकली आहे. मुळात महाराष्ट्रात भेटीवर बंधनं नाही. जर आणि तर याला राजकारणात महत्त्व नाही. आमच्यात डीफ्रन्स फक्त एक परप्रांतीय भूमिका आहे. त्यामुळे या भेटीचा राजकीय अनव्यार्थ नाही’, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचे आले आहे. पण ही अनेक वर्षांची मागणी होती. संपूर्ण भारताची मागणी होती. हिटलर जेव्हा दावा करत होता, तेव्हा मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा गर्व मोडला होता.आपण सर्वांनी या पुरस्काराच स्वागत करूया. ४१ वर्षानंतर मेडल हॅाकीत भारताला पदक मिळालं आहे’, असंही फडणवीस म्हणाले.
‘जर बसमध्ये बसल्यावर कोरोना होत नाही, मग रेल्वेमध्ये कसा होतो. लोकांना कामावर जावं लागणार आहे. रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. या लाईफलाईन मुळे लोकांचं जीवन अवघड झालं आहे. त्यामुळे सुरू करण्या संदर्भात आमचं आंदोलन सुरू झालं आहे. त्यामुळे आमची मागणी लक्षात घ्यावे. जनता जर होरपळत आहे, विरोधकांचं काम जनतेची हाक पोहचवणे आहे’, अशी प्रतिक्रिया रेल्वे आंदोलनावर दिली.

Leave a Reply