विश्व मांगल्य सभेच्या माध्यमातून दिल्लीत मातृशक्ती संमेलन झाले थाटात

नवी दिल्ली : ४ ऑगस्ट – मातृत्वाला कर्तुत्वाची जोड मिळाली तर समाजाचे नेतृत्व करण्याची संधी आपसुक मिळते. मातृशक्ती ही कुटुंबा पासून देशापर्यंत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करून कल्याण साधण्याची क्षमता ठेवते असे गौरवोद्गार संस्कार भारतीच्या नागपूर शहर अध्यक्ष कांचन गडकरी यांनी काढले. शुभ मंगल या सभेच्या वतीने दिल्ली येथे मातृशक्ती संमेलन व महिला मंत्री तथा खासदार यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विश्व मांगल्य सभेच्या संयोजिका खासदार सुनील मेंढे यांच्या सौभाग्यवती शुभांगी मेंढे यांच्या पुढाकारातून दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कांचन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जोरदोष, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, राज्यमंत्री डॉ. भारती पवार, हिंदू परिषदेचे विदेश मंत्री प्रशांत हरताळकर, मांगल्य सभेच्या दक्षिण क्षेत्र संघटनमंत्री गायत्री लोमटे आवर्जून उपस्थित होते.
गायत्री लोंढे यांनी शक्ती गीत गायले. विश्व मांगल्य सभेचा परिचय पूजा देशमुख यांनी करून दिला. यावेळी “नचिकेत” या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मंत्री आणि महिला खासदारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला रंजना बेन, गुजरात, खासदार डॉ. हीना गावित, खा. प्रीतम मुंडे, मध्य प्रदेशच्या खा. संध्या राय, खा. सम्पतिया उईके, पुष्पलता पटेल, पूनम माडम, भावनगरच्या खा. भारती शियाल, वडोदराच्या खा. रंजन भट्ट, महेसाणाच्या खा. जयश्री पटेल उपस्थित होत्या. मध्यप्रदेश खासदार के.पी.यादव यांच्या पत्नी अनुराधा यादव यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply