‘जनसंघ -१९५२ ते भाजपा-२०२०’ – जुन्या पिढीतील दस्तऐवज संकलनाला सहकार्य करा : नाना कुळकर्णी

बुलडाणा : ४ ऑगस्ट – भारतीय जनता पार्टीतर्फे अखिल भारतीय स्तरावर जनसंघ -१९५२ ते भाजपा २०२० पर्यंत कार्य करणार्‍या जून्या पिढीतील व्यक्ती, संस्थाचे तसेच या संघर्षाच्या काळात केलेल्या योगदानाची नोंद असावी या हेतुने दस्तऐवज संकलन करण्याचे कामाला सहकार्य करावे, असे आवाहन भाजपा दस्तऐवज समिती विदर्भप्रमुख नाना कुळकर्णी यांनी बुलडाणा येथे आयोजित बैठकीत केले.
येथील राजे गार्डन सभागृहात झालेल्या या बैठकीला नाना कुळकर्णी यांनी माहिती देतांना सांगितले की, दुर्मिळ छायाचित्रे, वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्याचे त्या काळातील कात्रणे असा सर्वसमावेशक माहितीचा दस्तऐवज संकलित करण्याचे कार्याला आपल्या मदतीची अपेक्षा आहे.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा, माजी आ. विजयराज शिंदे, अ‍ॅड. व्ही. डी. पाटील, नंदुकुमार खडके, संजय कुळकर्णी यांनी आपले अनुभव कथन केले. भाजपाचे माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा, जेष्ठविधीज्ञ व्ही. डी. पाटील, किसान आघाडी प्रदेश सचिव दीपक वारे, प्रा. जगदेवराव बाहेकर, नंदूकुमार खडके, कडूबा पवार, दादा गोडबोले, वैजयंती कस्तुरे, माजी आ. विजयराज शिंदे, प्रतिभा पाठक, भास्कर बाहेकर, संजय कुळकर्णी, उल्हास पाठक, सखाराम नरोटे, मुकुंद जोशी, विश्राम पवार, दिगंबर अंभोरे, नगरसेवक अरविंद होेंडे, राजाराम कानडजे, मंदार बाहेकर यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply