वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पेगासस आणि युवराज !

सध्या आपल्या राजकीय रंगमंचावर
‘ पेगासस’ नावाचं नाटक चांगलंच रंगात आलं आहे !
मीडियावर आणि सर्वत्र त्याचीच चर्चा आहे !
त्यावरून रोज संसदेत गधारोळ माजवून ती बंद पाडण्यात येत आहे !
पण मूळ ‘ पेगासस’ म्हणजे काय हे कोणाला माहीत आहे ?
ग्रीक पुराणानुसार ‘ पेगासस’हा पंख असणारा उडता घोडा होता !
आणि तो मेडुसा नावाच्या राक्षसीच्या रक्तापासून उत्पन्न झाला होता !
तर आपल्या या नाटकातील ‘पेगासस’चं भूत , समस्त भारतविरोधी प्राण्यांच्या सडक्या मेंदूतुन निर्माण झालं आहे !
मूळ कथेत मिनर्वा देवतेच्या कृपेने हा घोडा बेलेफेरॉनला मिळाला होता
तर आपल्या या नाटकात तो पश्चिमी मीडियाच्या कृपेने पप्पूराजाच्या हाती लागला आहे !
आणि ते त्यावर स्वार होऊन मस्त उधळले आहेत !
पण त्यांना हे माहीत नाही कि ‘पेगासस’वरून पडून बेलेफेरॉन आंधळा आणि लंगडा झाला होता !
तेव्हा आपण आपल्या युवराजांची आणि त्यांच्या साथीदारांची अवस्था लवकरच कशी होते ते बघूया !
आणि या युवराजांची अवस्था त्या बेलेफेरॉनसारखी न होवो म्हणून प्रार्थना करू या !

       कवी -- अनिल शेंडे 

Leave a Reply